राजुऱ्यात फडकनार ७५ फुट उंचीचा राष्ट्रध्वज. — माजी नगराध्यक्ष अरुण धोटे.

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

नगर परिषद राजुरा च्या वतीने शहरात फडकणार ७५ फुट उंचीचा राष्ट्रध्वज.

राजुरा — भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या पाश्र्वभूमीवर राजुरा येथे ७५ फुट उंचीचा राष्ट्रध्वज लागावा, स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या महान राष्ट्रभक्त, स्वातंत्र्य सैनिक यांचे स्मरण व्हावे, राष्ट्रध्वजाचा सन्मान व्हावा यासाठी स्वातंत्र्याचे ७५ वर्ष ७५ फुट उंचीचा राष्ट्रध्वज उभारण्याचे नियोजन जवळपास वर्षभरापूर्वीच केले होते. हा ७५ फुट उंचीचा राष्ट्रध्वज माय लव्ह माय राजुरा या पाईंट जवळ उभारण्याचे नियोजन होते मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे आता हे ठिकाण नगर परिषद च्या लगतच्या भागात मामा तलावाजवळ ठरविण्यात आले असुन मा. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते राजुरा येथे आज दिनांक १३ आँगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता राजुरा नगर परिषदेच्या वतीने ७५ फुट उंचीचा राष्ट्रध्वज फडकणार आहे. या प्रसंगी शहरवासीयांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या अभियानासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्या जात आहे. १५ आॅगस्टसाठी लोकांमध्येही उत्साह आहे. मात्र केवळ १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारी पूरता न राहता तो कायम राहला पाहिजे. यासाठी सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देत सहभाग नोंदविला पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here