पाटोदा बंकटस्वामी विद्यालयात ह. भ .प .गुरुवर्य श्री वसंत महाराज लोळदगाव यांच्या दिंडीचे जंगी स्वागत

 

लोकदर्शन बीड पाटोदा ;👉राहुल खरात

खडकीघाट येथील विद्यालयात दत्त संस्थान लोळदगाव यांच्या दिंडीचे गेल्या 29 वर्षापासून ह. भ .प . वैकुंठवासी बंकटस्वामी महाराज यांच्या नावाने चालवलेल्या बंकटस्वामी विद्यालयात याही वर्षी दिंडीचे स्वागत करण्यात आले .तसेच दिंडीतील सर्व महिला पुरुष यांना भोजनाची सोय शाळेतर्फे केली जाते .मुख्याध्यापक श्री संजय सावंत सर तसेच विद्यालयातील शिक्षक श्री उंदरे सर श्री सुपेकर सर श्री रामहरी रिंगने सर श्री आनेराव सर श्री मोरे सर श्री तानाजी खाकरे सर श्री अविनाश खाकरे सर सुरेश भोसले संजय बनसोडे अशोक मांजरे पोपट कुरे श्री सुरेश भोसले श्री संजय बनसो डे श्री बाबुराव कानडे श्री कल्याण अनंत्रे इ. सर्व कर्मचारी यांच्या तर्फे दिंडीची व्यवस्था केली होती.
या वेळी गुरुवर्य ह. भ. प. श्री वसंत महाराज यांनी वारकरी संप्रदाय विषयी अमृततुल्य असे आपले विचार व्यक्त केले तसेच याप्रसंगी गावातील भजनी मंडळ महिलावर्ग ज्येष्ठ नागरिक व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी कार्यक्रमात उपस्थित होते
शेवटी कार्यक्रमाची सांगता गुरुवर्य ह-भ-प श्री वसंत महाराज यांनी शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय सावंत सर यांना श्रीफळ भेट दिले व कार्यक्रम संपला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here