सरपंच वाढई यांच्या पुढाकारातून कळमनाच्या नाल्यांवर सिमेंट काँक्रीट ची झाकणे.

 

लोकदर्शन👉 मोहन भारती

राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या पुढाकाराने गावातील खुल्या असलेल्या नाल्यांवर सिमेंट कांक्रिट ची झाकणे झाकून गटारे बंदिस्त करण्याचे काम मोठ्या उत्साहाने सुरू करण्यात आले. या कामासाठी सरपंच वाढई यांनी स्वखर्चाने मोठा वाटा उचलला असून काही प्रमाणात लोकसहभागातून खर्च उचलल्या जात आहे. लोक गाव स्वच्छ, सुंदर, हिरवगार व आरोग्य संपन्न करण्याकरता स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन या कामात सहकार्य करीत आहेत. त्यामुळे गावामध्ये रोगराई व साथीचे आजार पसरण्याचा आडा बसेल असे मत सरपंच नंदकिशोर वाढई यांनी व्यक्त केले आहे. तर गावाच्या विकासासाठी, आरोग्यासाठी सरपंच वाढई हे नेहमीच हिरिरीने पुढाकार घेत असल्याने ते राबवित असलेल्या उपक्रमांना स्थानिक नागरिक उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे कळमना गाव स्वच्छ सुंदर व आरोग्यदायी गाव म्हणून समोर आल्याशिवाय राहणार नाही असी स्थिती निर्माण झाली आहे.
या प्रसंगी आशिष कावडे, रवि वाढई, अमोल कावडे, मंगेश पिंपळशेंडे, भूषण ताजणे, नितेश पिंगे, रमाकांत वाढई, संजय निकोडे, पुरुषोत्तम अटकारे, मारुती वाढई यासह अनेक नागरिकांनी गटार झाकण्या करता मदत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here