सोमवार दि 27 जून 2022 रोजी कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालय येथे करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि. 24 जून 10वीं,12वीचे आता निकाल लागलेले आहेत.अनेक जणांनी या परीक्षेत उत्तम गुणसुद्धा प्राप्त केलेले आहेत. आता विद्यार्थ्यांना पुढे काय करायचे असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे 10 वी, 12 वी नंतर कोणकोणते व्यवसाय क्षेत्र/ नोकरिच्या संधी आहेत. कोणते कोर्स केल्यावर कोणत्या नोकऱ्या लागू शकतात या बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून 10 वी पास, 12 वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सोमवार दि 27/6/2022 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत उरण शहरातील तहसिल कार्यालय समोरील कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here