पुष्पा परशुराम प्रतिष्ठान तर्फे महिलांचा विशेष सत्कार.

लोकद्दर्शन 👉 विठ्ठल ममताबादे

उरण दि 15 जून
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच महिलांसाठी विशेष महत्वाचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वटपौर्णिमेनिमित्त पुष्पा-परशुराम प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांचा विशेष सत्कार करून त्यानिमित्त महिलांना छत्री वाटप करण्यात आले . या कार्यक्रमास प्रतिष्ठान चे अध्यक्ष तसेच मनसेचे माजी रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत तसेच आदर्श सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष वैभव भगत, उपाध्यक्ष राकेश भगत, जय भगत, नारायणशेठ म्हात्रे आदी प्रतिष्ठानचे सर्व सभासद तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजक पुष्पा-परशुराम प्रतिष्ठान,भेंडखळ-उरण तर संयोजक – आदर्श सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ,भेंडखळ होते.सदर उपक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here