महाराष्ट्रातील विविध रत्नांचा सन्मान….नितीन गडकरी.

लोकदर्शन 👉 राहूल खरात

आज युआरयल फाऊंडेशनच्या वतीने मा. उदयदादा लाड यांच्या संकल्पनेतून कृतज्ञता दिवस म्हणून गेली वीस वर्ष विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या वर्षी राज्यातील
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या नामवंत वैयक्तिचा सन्मान करण्यात आले,
तर 2022 चा युआरयल फाऊंडेशन गौरव पुरस्कार या वर्षी आदिवासींसाठी विशेष महत्त्वपूर्ण योगदान देऊन गेली बावीस वर्ष गरीब, शोषित,पिढीत, वंचित लोकांसाठी काम करणारे आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव ज्ञानदेव भोसले यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अतीशय आनंद होत आहे. नामदेव भोसले यांचे काम गेली दहा वर्ष मला परिचित आहे असे मत केंद्रीय परिवहन मंत्री मा. नितीन गडकरी यांनी व्यक्त कले, सदर या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून नितीन गडकरी,(केंद्रीय मंत्री भारत सरकार)
मा. उदयदादा लाड, तर
प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री.डाॅ. रविंद्र कोल्हे,डाॅ. गिरीश कुलकर्णी, आशुतोष शेवाळकर, यांच्या हस्ते साहित्यीक नामदेव ज्ञानदेव भोसले,आदिक कदम ,अभिजीत सोनवणे,मुक्ता दाभोळकर (महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातारा) सचिन गोस्वामी, सचिन मोटे,अभिनेता समीर चौघुले यांना प्रत्येकी एक लाख रुपये सन्मानपत्र स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. नामदेव भोसले म्हणाले की
हा माझा सन्मान नसुन तो राज्यातील दुःख पीढीत बांधवांचा आहे,माझे आजपर्यंतचे सर्व एकशे सत्तेचाळीस सन्मान माझ्या पिढीत कुटुंबातील गुरुजनांच्या चरणी अर्पण करत आहे..नामदेव भोसले आसे म्हणाले त्यांना पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here