कर्जबाजारीपणामुळे अनिल डंभारे या तरूण शेतकऱ्याची आत्महत्या.

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा सुमठाणा येथील तरूण शेतकरी अनिल गणपत डंभारे वय वर्षे २९ याने कर्जबाजारीपणामुळे नैराश्यातून आत्महत्या केली. त्याच्या मागे पत्नी, एक मुलगा, आई, वडील असा बराच मोठा आप्त परिवार आणि ग्रामस्थ शोकाकुल आहेत. त्याचेवर स्टेट बँक ऑफ हैदराबाद चे १ लाख ५० हजार रुपये कर्ज होते. विशेष म्हणजे वडील आंधळे असल्याने कुटुंबाचा संपूर्ण भार त्याच्यावर होता मात्र कर्जबाजारीपणामुळे नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलून जीवन संपवले. त्याच्या या निर्णयामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here