लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
भाजपाचे ज्येष्ठ नेते , कोषाध्यक्ष श्री प्रतापभाई आशर यांच्या निधनाने पक्षाचा मोठा आधारस्तंभ हरपला आहे.कोषाध्यक्ष म्हणून अतिशय प्रामाणिकपणे निष्ठेने त्यांनी अनेक वर्ष काम केले. मार्गदर्शकाच्या भूमिकेतून अनेकांना त्यांनी पक्षकार्यासाठी प्रेरित केले. अखेरच्या क्षणापर्यंत ते पक्षकार्यात सक्रिय होते.
प्रसन्नवदन चेहरा आणि समर्पित जीवन यामुळे अनेकांसाठी ते प्रेरणादायी होते. श्री प्रतापभाई आशर यांच्या निधनाने एका ध्येयनिष्ठ आणि समर्पित व्यक्तिमत्त्व हरपले आहे. त्यांच्या निधनाने पार्टीची अपरिमित हानी झाली आहे .या दुःखातून सावरण्याचे बळ परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना देवो असेही माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.