आटपाडी डॉ शंकरराव खरात यांच्या स्मारकासाठी संजय काका पाटील,अनिल भाऊ बाबर, , गोपीचंद पडळकर यांच्या सहकार्याने हे कार्य पार पाडू राजेंद्र आण्णा देशमुख माजी आमदार,

लोकदर्शन 👉 राहुल खरात

आटपाडी ; आटपाडी मध्ये आज डॉ शंकरराव खरात स्मृती समारोप सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी राजेंद्र आण्णा देशमुख बोलत होते, सर्वांनी एकत्रित येऊन आपण हे कार्य पार पाडू असे सांगितले
11 जुलै रोजी 5 जिल्हा मधुन येणाऱ्या जोती चे स्वागत करू
अखिल भारतीय साहित्य संमेलन आटपाडी मध्ये घेऊन 2 दिवस सर्व शाळा मध्ये हा उपक्रम राबवू असे सांगितले
आटपाडी च्या सरपंच वृषाली पाटील यांनी आटपाडी ग्रामपंचायत सर्व मदत करेल असे सांगितले !
ऍड धनंजय पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले !

पंढरपूर चे धाडोरे, प्राध्यापिका सुरेखा भालेराव यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले

डॉ शंकरराव खरात यांचे चिरंजीव डॉ रवी खरात यांनी सर्व समाजातील लोकांचा सहभाग असावा असे सांगितले स्मारक का असावे या विस्तृत मार्गदर्शन केले

जेष्ठ पत्रकार सादिक खाटीक यांनी जुन्या आठवणी ताज्या केल्या व स्मारकासाठी सर्वांनी मिळून ना जयंत पाटील यांची भेट घेऊन हा स्मारकासाठी सर्वांनी पार पाडू असे सांगितले

जीवन गौरव पुरस्कार मिळाला त्या बदल सचिव विलास खरात यांचा सत्कार करण्यात आला

रमेश पेंटर ,रमेश जावीर, सुधीर इनामदार, रघुराम मेटकरी, सुरेखा, भालेराव, अरुण कांबळे बनपूरीकर, विजय मोटे, बा, ना,धानडोरे,जीवन सावंत,विजय पवार,अरविंद चनडवले, स्नेहजीत पोतदार,विजय देवकर, राजेंद्र खरात,आर पी आय जिल्हा अध्यक्ष, साहेबराव वंचित अध्यक्ष, अरुण वाघमारेअध्यक्ष, बंडोपंत देशमुख, प्रा, गौतम,गायकवाड अनिल लांडगे, डॉ अमोल लांडगे, आनंद एवले, माडगूळ सरपंच, गवळी, विजय देशमुख ,दिलिप सपाटे,उत्तम बालटे व मोठया संख्येने लोक उपस्थित होते

सूत्रसंचालन प्राचार्य लोंढे सर यांनी केले,
आभार दीपक खरात सर यांनी केले!

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *