Home
Home गडचांदूर / कोरपणा श्री प्रभू रामचंद्र विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात आंतरशालेय क्रीडा स्पर्धा

श्री प्रभू रामचंद्र विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात आंतरशालेय क्रीडा स्पर्धा

By : Shankar Tadas

नांदा फाटा (कोरपना) : दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शैक्षणिक सत्र 2025 26 अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याकरिता विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये कबड्डी खोखो वॉलीबॉल लंगडी रसाखेच उंच उडी लांब उडी व विविध मैदानी खेळांचा समावेश होता. क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन समारंभास संस्थेच्या अध्यक्ष सौ सुनीताताई वीरेंद्र लोढिया, सहसचिव साईदासजी रोगे, व्यवस्थापक मंडळाचे पदाधिकारी कोरपना पंचायत समितीचे माजी सभापती संजय मुसळे, किसनराव गोंडे, मनोहर जी झाडे, ज्येष्ठ शिक्षिका स्मिता देवतळे, ज्येष्ठ शिक्षक संदीप खिरडकर, पालक प्रतिनिधी डेबुजी मानापुरे प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी अध्यक्ष महोदयांनी रणनीती आखून खेळ खेळावा व कौशल्य दाखवावे असे मनोगत व्यक्त केले तीन दिवस चालणाऱ्या या क्रीडा स्पर्धांमध्ये विविध कौशल्य प्राप्त विद्यार्थ्यांचा खेळाडूंचा समावेश असून उद्घाटनिय समारंभाचे संचालन क्रीडा शिक्षक प्रमोद वाघाडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्राध्यापक प्रकाश लालसरे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता तब्येत नाही पण सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here