By : Shankar Tadas
नांदाफाटा (कोरपना)
नांदा येथील श्री प्रभू रामचंद्र विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले जयंती नुकतीच संपन्न झाली यावेळी मंचावर विद्यालयाचे प्राचार्य अनिल मुसळे व विशेष करून सर्व स्त्री शिक्षिका कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी विद्यार्थ्यासाठी प्रामुख्याने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित वेशभूषा प्रसंग वर्णन व भाषण स्पर्धा घेण्यात आली अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात प्रवीण प्राप्त स्त्रियांची विविध उदाहरणे देत उपस्थित पाहुण्यांनी मार्गदर्शन केले तसेच स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या वेशभूषा धारण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले समस्त कार्यक्रमाचे संचालन यश दाभेकर आणि रिया उइके या विद्यार्थ्यांनी तर आभार प्रदर्शन खुशी मानापुरे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले





