सहकार विद्या मंदिर येथे निवडणुक प्रशिक्षण संपन्न

लोकदर्शन देऊळगाव राजा👉 प्रा.अशोक. डोईफोडे
मा.भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता निवडणूक कार्यक्रम घोषित केला असून दिनांक 16 मार्च 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे त्या अनुषंगाने सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील सर्व बी एल ओ यांची आज दिनांक 11 एप्रिल 2024 रोजी एक दिवसाचे प्रशिक्षण सहकार विद्या मंदिर सिंदखेड राजा येथे मा. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्री.संजय खडसे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली.

आज दिनांक 11 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 वाजता सहकार विद्या मंदिर सिंदखेडराजा येथे 24 सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील मतदार चिट्ठ्या, अंतिम मतदार यादी,मतदार माहिती नोंदवही, मतदार मार्गदर्शक पुस्तिका वाटप करण्यात आले.

सर्व बीएलओ यांनी आपले मतदान साहित्य घेऊन मतदारांना वोटर स्लिप वाटप करायचे आहेत, सदर स्लीप या घरपोच करायचे आहेत. सदर मतदान स्लिप वाटप बाबत एस 13 नमुना नोंदवहीत नोंद करून शंभर टक्के वाटप करायचे आहेत याची दक्षता सर्वांनी घ्यायला घ्यावी असे मा.खडसे यांनी सांगितले.

आपण निरीक्षण करून दिव्यांग मतदार व 85 वर्षावरील मतदार निरीक्षण करून यादी सादर केलेली आहे तसेच वरीलपैकी मतदार जर गैरहजर असेल तर ती वोटर स्लिप जपून ठेवायची आहे व स्थलांतरित मतदार याची नोंद घेऊन एस 13 नमुना नोंदवहीत नोंद करून यादी सादर करायचा आहे. वाटप झालेले मतदान चिट्ठी बाबत प्रमाणपत्र आणि उरलेले स्लिप व साहित्य जमा करण्यात यावे.

दिव्यांग मतदार व 85 वर्षे वरील मतदार यादीनुसार एकूण 628 अर्ज प्राप्त झाले आहेत, दिनांक 20 एप्रिल 2024, 21 एप्रिल 2024,22 एप्रिल 2024 पर्यंत घरपोच मतदान प्रक्रिया करून घेण्यात येणार आहे त्याकरिता 18 पथक तयार करून नियुक्त करण्यात आले आहेत. सदर पूर्ण प्रक्रिया करता बीएलओ यांनी गावांमध्ये उपस्थित राहायचे आहे.

बीएलओ यांनी मतदार गैरहजर राहिल्यास मतदार यांचे चिठ्ठी वितरण बाबत प्रश्न उपस्थित केला असता याबाबत सदर मतदार स्थलांतरित असल्यास त्याची नोंद एस 13 नमुना नोंदवहीत करून घ्यावी व तसा अहवाल सादर करावा.

बी एल ओ यांनी आपले EDC फॉर्म भरून निवडणूक शाखेमध्ये जमा करावे त्याकरिता आपणास ईडीसी फॉर्म उपलब्ध करून देण्यात आले आहेत, सर्वांनी आपापले ओळखपत्र तयार करून घ्यावे अशा सूचना मा. खडसे यांनी दिल्या.

आजच्या बैठकीला मा.तहसीलदार सिंदखेड राजा श्री. सचिन जयस्वाल, मा. मुख्याधिकारी सिंदखेड राजा श्री.प्रशांत व्हटकर , मा. गटविकास अधिकारी देऊळगावराजा श्री. मुकेश महोर,मा.नायब तहसीलदार श्री. मनोज सातव ,मा.श्री.नितीन बढे प्रभारी नायब तहसीलदार तथा अ. का., मा. श्री. सतीश वाकडे पाणीपुरवठा अभियंता इत्यादी अधिकारी तसेच सर्व कर्मचारी वृंद प्रसार माध्यम मध्ये असलेले श्री गरकळ व श्री संजय सोनुने महसुल सहाय्यक उपस्थित होते…
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *