शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचा समारोप

By : KP Gatade

कोरपना – नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत येत असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणाचा अधिकारी समारोप पार पडला. गडचांदूर येथील होली फॅमिली पब्लिक कॉन्व्हेंटच्या सभागृहात सदर प्रशिक्षण घेण्यात आले असून पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण श्री. शिवाजी इंग्लिश स्कूल नांदाफाटा येथे पार पडले. या प्रशिक्षणात रुपेश विरुटकर, सलमा कुरेशी, एस. के. शुक्ला, प्रदीप परसुटकर, स्वप्निल सातपुते, निकेतन जयपूरकर, साईनाथ मेश्राम व शामराव पवार यांनी तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम पाहिले. कोरपना गटशिक्षणाधिकारी सचिन मालवी, केंद्रप्रमुख मुसळे, विषय साधन व्यक्ती भीमराव कोरडे यांच्या मार्गदर्शनात सदर प्रशिक्षण सुरळीत पार पडले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *