Home
Home Breaking News महाशिवरात्रीनिमित्त वडगावात भजन संमेलन ♦️बालगोपालांनी केले उद्घाटनिय भजन

महाशिवरात्रीनिमित्त वडगावात भजन संमेलन ♦️बालगोपालांनी केले उद्घाटनिय भजन

लोकदर्शन 👉 मोहन भारती

कोरपना – तालुक्यातील वडगाव येथे ह.भ.प. विठ्ठल डाखरे महाराज यांच्या संकल्पनेतून भजन संमेलनाचे आयोजन महाशिवरात्रीच्या निमित्ताने शुक्रवारी पार पडले.
या संमेलनात परिसरातील विविध गावातील महिला भजन मंडळींनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तम पेचे उपस्थित होते तर उद्घाटन जिल्हा स्मार्ट ग्राम बिबीचे उपसरपंच आशिष देरकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मंचावर ग्रामपंचायत वडगावचे उपसरपंच सुदर्शन डवरे, त. मु. अध्यक्ष भोंगळे गुरुजी, पो.पा. कलावती मडावी, ग्रामपंचायत सदस्या संचीता मडावी, सदस्य शामकांत निखाडे, कैलाश मेश्राम, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शंकर पिंगे, भाऊराव उरकुडे, वासुदेव पिंपळकर, अशोक आस्कार, रागीट महाराज उपस्थित होते. भजन संमेलनात एकूण दहा भजन मंडळींनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे संचालन रामचंद्र काकडे यांनी केले. तर आभार स्वप्निल पाचभाई यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here