वरोरा तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट; शेतपिकाचे नुकसान : १५ मिनटांच्या पावसाने १५ तास वीजपुरवठा खंडित

By : Rajendra Mardane 

वरोरा : शनिवारी सायंकाळी तालुक्यातील बहुतांश भागात मुसळधार अवकाळी पावसासह गारपीट झाली. मेघगर्जनेसह १५ ते २० मिनटे बोर ते लिंबा एवढी गारपीट झाल्याने शेतातील रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशातच वीज पुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांसह , नागरिकांचीही तारांबळ उडाली.
अधिक माहितीनुसार शनिवारी दुपारपासूनच ढगाळ वातावरण होतं त्यात सांयकाळी सात वाजताच्या सुमारास वरोरा तालुक्यातील विविध भागात अचानकपणे अवकाळी पावसासह गारपीटाला सुरुवात झाली. गारपीटाचा मारा जबरदस्त असल्याने रब्बी हंगामातील हरभरा, गहू, फळबागांची तसेच खरीप हंगामातील उभ्या असलेल्या तूरी पिकाचे नुकसान झाले असल्याची माहिती समोर येत आहे.
राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाल्याने किमान तापमानात वाढ झाली आहे. विदर्भातील जिल्ह्यांत तूरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा ( येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला होता. त्यानुसार शनिवारी तालुक्याला अवकाळी आणि गारपीटाने झोडपले.

*१५ मिनटांचा पाऊस; १५ तास वीजपुरवठा खंडित*
वरोरा तालुक्यात शनिवार, १० फेब्रुवारी रोजी सांयकाळी सात वाजताच्या सुमारास अचानकपणे अवकाळी पावसाचा तडाखा बसला. गारपीटासह जोरदार पाऊस बरसताच वरोरा शहराला व वीज वितरण कंपनी लागून असलेल्या बोर्डा परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. पाऊस थांबल्यावर वीजपुरवठा पूर्ववत सुरू होईल अशी आशा असताना कित्येक तास वीजपुरवठा सुरळीत चालू झाला नाही. येथील नागरिक रात्रभर अंधारातच होते. जवळपास १५ तासांच्या प्रतिक्षेनंतर सकाळी ९ – १० वाजताच्या सुमारास वीजपुरवठा सुरू झाला. केवळ १५ मिनटांच्या पावसात जर १५ तास वीजपुरवठा खंडित होत असेल तर याला काय म्हणावे? यामुळे विद्युत विभागाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे?
उन्हाळ्यात अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेता नागरिकांना अवाजवी वीजपुरवठा खंडित होण्याचा अधिक त्रास होऊ नये यासाठी विद्युत वितरण विभागाने सतर्क राहुन तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पावले उचलाण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *