‘मेरा नांदाफाटा मेरा अयोध्या’ संकल्पनेतून नांदाफाटा येथे श्रीरामजन्म उत्सव व अष्टसिद्धी हनुमान मंदिर समितीकडून स्वच्छता अभियान

By : Ravikumar Bandiwar

नांदा फाटा :श्रीराम जन्मभूमी अयोध्या नगरीतील श्रीरामलल्ला चे पुजन व जल्लोष नांदा फाटा शहरात मोठ्या उत्साहात होत आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या आवाहनानुसार ‘मेरा गाव मेरी अयोध्या’ या संकल्पनेच्या धर्तीवर नांदा फाटा शहरात श्रीराम जन्म उत्सव समितीच्या वतीने ‘मेरा नांदा फाटा मेरी अयोध्या’ हे अभियान राबवले गेले. यात सहभागी होऊन शहरातील श्री अष्टसिद्धी हनुमान मंदिर देवस्थान, शिव मंदिर ( श्रीवास्तव कांलोनी ) परिसरात सामुहिक स्वच्छता केली. या स्वच्छता अभियानात यूवा उद्योजक निलेश ताजने , सुंगर पंडित,सांगर ऊंपलेचवार , रविकुमार बंडीवार , आकाश बोंनगीरवार, संजय नित, धनराज शेखावत, बलवंत चव्हाण, सुजित ठाकुर , गिरीश बोंगावार , संजय बुरगाटे , किसन बांदुरकर , लखन बावने, मारोती बुडे , मारोती बावने, विक्की वालदे ,योगेश यावले , गोविंद गुप्ता, गुलाब राठोड , यांचेसह मोठ्या संख्येने विविध राजकीय, सामाजिक तसेच धार्मिक क्षेत्रातील कार्यकर्ता-पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता.

#श्रीरामलल्ला_प्राणप्रतिष्ठा# #स्वछताअभियान#

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here