*मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते सेवा केंद्राच्या दिनदर्शिका-२०२४ चे प्रकाशन.*

गडचांदुररविकुमार बंडीवार

स्थानिक मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या सेवाकार्यावर आधारीत दिनदर्शिका – २०२४ चे प्रकाशन काल (दि. २७) राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथराव शिंदे यांच्या शुभहस्ते चंद्रपूरातील वनविश्रामगृहात पार पडले.

याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार तसेच राज्याचे क्रिडा मंत्री ना. संजयजी बनसोडे यांचीही त्यांसमवेत उपस्थिती होती.

राजुरा शहरात मागील ऑगस्ट महिन्यामध्ये स्थापन झाल्यापासून सेवा केंद्राच्या अव्याहत सेवा कार्याचा धावता आढावा या दिनदर्शिकेच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहचविण्याचा आमचा मानस असून ही दिनदर्शिका संपुर्ण राजुरा विधानसभा क्षेत्रात निःशुल्क वितरीत करण्यात येणार आहे. अशी माहिती यावेळी विधानसभा निवडणुक प्रमुख तथा माजी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी उपस्थितांना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here