40 कामगारांना पूर्ववत कामावर घ्या प्रहारचे जिल्हाध्यक्ष बिडकर यांची मागणी* *♦️अन्यथा प्रहार स्टाईल ने आंदोलन*

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गेल्या सहा वर्षा पासून 40कामगार बालाजी मार्केटिंग ही माणिकगड सिमेंट कपनित ठेकेदार पद्धतीवर कामगारांना काम देत होती मात्र दोन महिन्या पासून कुठलही काम नाही व कोणतीही पूर्व सूचना न देता सर्व कामगारांना कामावरून कमी केल्या गेले दोन महिन्यापासून बेरोजगार असल्याने सर्व कामगारांनी प्रहारचे जिल्हा अध्यक्ष बिडकर यंची भेट घेऊन आपबिती सांगितली.
सर्व कामगार बेरोजगार असून त्यांच्या जीवन मरण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
हे सर्व कामगार गेल्या सहा वर्षा पासून बालाजी मार्केटिंग या ठेकेदारा कडे ठेकेदार पद्धतीवर काम करीत होते काम वरून कमी करणे वा काम न देणे याबात आधी नोटीस वा कोणतीही लेखी माहिती द्यावी लागते मात्र ठेकेदाराने असे काही ही केले नाही उलट सर्व कामगारांना काम देणे बंद केले यात सर्व कामगारनचा घर खर्च मुलाचं शिक्षणना खर्च आईवडिलांच्या आजारपणाचा खर्च घर भाडे व रोजच्या मूलभूत सुविधा भागवणे कठीण झाले असून आम्ही नेमक काय करायचं जगायचं कि, आत्महत्या करायची? असा प्रश्न कामगारांवर आला बिडकर यांनी सर्व कामगारांना घेऊन सहायक आयुक्त श्रम कामगार भारत सरकार यांची भेट घेतली व चर्चा करून निवेदन देण्यात आले त्यांच्या कडून सकरात्मक चर्चा झाली.

निवेदन देताना पंकज मनुसमारे, आशिष आगरकर प्रवीण शिंदे, किशोर टोंगे संजू गोडे,
प्रशात बुरान, सुरज शेंडे, , रविंद्र वडस्कर, महेश सोयाम, सुरेश केंद्रे, अनिल तासलवार, विशाल कामडे विकास ठाकरे, मनोज जुनघरे, आकाश पथाडे, करण तलवार, धोडीबा काचगुंडे , करनु सिडाम, प्रकाश शेरकी, शनश्वर चिमनकर, रमेश उरकुडे, मंगेश शेळके, अश्विन वाघाडे, प्रमोद जुनाघर, अक्षय जानवे, वसंता कामडे, प्रमोद तिरणकर, योगेश ठाकरे, राकेश उरकुडे
रोहीत सुरतेकर, आकाश कीचेकर, भारत आगेकर, अमोल पाचभाई, समाधान पिदुरकर, अविनाश वाघमारे, नंदकिशोर केलझडकर रणजित केलाझडकर, व अन्य कामगार उपस्थित होते.

तरी येत्या १५ दिवसात कामगारांना पूर्ववत कामावर घेण्यात यावे अशी मागणी बिडकर यांनी केली . अन्यथा १५ दिवसानंतर प्रहार पार्टी कामगारांना घेऊन कधी पण कुठ पण कोणत पण प्रहार स्टाईल ने आंदोलन करणार अशी माहिती प्रहारचे जिल्हाध्यक्ष बिडकर यांनी दिली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *