राष्ट्रभक्ती सदैव मनामनात तेवत राहावी : आ. किशोर जोरगेवार

by : Devanand Sakharkar

चंद्रपूर :

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशात सर्वत्र साजरा होत असताना चंद्रपूरमधे सुद्धा या अमृत महोत्सवानिमित्त 100 फूट उंच तिरंगा ध्वज सतत फडकत राहावा व राष्ट्रभक्तीची भावना कायम मनामनात धगधगत रहावी असा संकल्प चंद्रपूर विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केला होता.
यासंदर्भात त्यांनी स्थानिक जिल्हाधिकारी विनय गौडा , जिल्हा पोलीस अधीक्षक रविद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांच्याशी चर्चा करून त्या दृष्टिने प्रयत्न सुरु करण्यात आले होते.
या संकल्पनेला आज मुर्त स्वरूप प्राप्त झाले . स्थानिक पोलीस मुख्यालय परिसरात हा 100 फूट उंच तिरंगा ध्वज उभारण्यात आला असून या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विनय गौडा , पोलीस अधीक्षक रविद्रसिंह परदेशी , मनपा आयुक्त विपीन पालीवाल , सहाय्यक पोलीस अधिक्षक मिना जनबंधू , तहसीलदार विजय पवार , सा.बा.वि. उपविभागीय अभिनंदन प्रकाश अमरशेट्टीवार, यंग चांदा ब्रिगेड शहर अध्यक्ष पंकज गुप्ता , महिला आघाडी अध्यक्ष वंदना हातगावकर आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी राष्ट्र भक्ती ही क्षणिक न राहता ती कायम मनामनात तेवत राहावी असे आवाहन करीत भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचे स्मरण आपण करायला हवे असे मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाच्या औचित्याने जिल्हाधिकारी विनय गौडा , पोलीस अधीक्षक रविद्रसिंह परदेशी , मनपा आयुक्त विपीन पालीवाल आदिंनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या औचित्य साधत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डाॅक्टर रविकांत खोब्रागडे, पोलीस नाईक, शुटर अजय मराठे, वाहन चालक अक्षय दांडेकर, अमोल कोरपे यांनी आजवर 58 वाघ पकडण्यात यशस्वी कार्य केल्यामुळे त्यांच्या अतुलनीय कामगीरी बद्दल सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाखा अभियंता भट्टड, बोधनवार, डोंगरे यांच्यासह राखीव पोलीस निरीक्षक किसन नवघरे आणि संपूर्ण पोलीस विभाग यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला शहरातील गणमान्य नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *