अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींचे शासकीय वसतीगृहे तातडीने सुरु करा. ⭕आमदार सुभाष धोटेंच्या सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकाऱ्यांना सूचना : अन्यथा काँग्रेसच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा.

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– चंद्रपूर जिल्ह्यातील अनुसूचित जमाती मुला-मुलींचे शासकीय वसतीगृह शैक्षणिक सत्र सुरु होऊन सुद्धा कित्येक दिवस झालेत परंतु अजूनही सुरु झालेले नाहीत. अनेक शाळा, कनिष्ठ महाविद्याल, महाविद्यालय व इतर शैक्षणिक संस्थांचे शैक्षणिक सत्र सुरु होऊन दिड ते दोन महिन्यांचा कालावधी होत असतांना जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाचे वसतीगृह अजुनही सुरु न होणे हि बाब अतिशय खेद जनक आहे. शाळा महविद्यालयाचे निकाल जाहीर होऊन विद्यार्थांची वरच्या वर्गात बढती झाली. त्यामुळे बाहेर गावी तालुक्याचे/जिल्ह्याचे ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनकरीता वसतीगृहाची आवश्यकता आहे. अनेक विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असल्याने वसतिगृहाच्या माध्यमातुन शहराच्या ठिकाणी प्रवेश घेऊन आपले शिक्षण पूर्ण करण्याकरीता शहराचे ठिकाणी येत असतात. जवळपास ६० ते ७० टक्के विद्यार्थी वसतिगृहात प्रवेशित आहेत. शैक्षणिक सत्र सुरु होऊन बराच कालावधी पूर्ण होत आहे. मात्र शासनाच्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्याची गौरसोय होत आहे. शैक्षणिक सत्र सुरु होण्यापूर्वी शासकीय वसतीगृहातील विविध सुविधा निर्माण करून विद्यार्थांचे शैक्षणिक सत्र सुरु होताच वस्तीगृहातील प्रवेश निश्चित करून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही हि जबाबदारी प्रशासनाची असतांना याकडे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.
करीता सदर बाब हि गंभीर असल्याने याकडे जातीने लक्ष देऊन चंद्रपूर जिल्ह्यातील अनुसूचित जमाती मुला-मुलींचे शासकीय वसतीगृहे तातडीने सुरु करणेबाबत कार्यवाही करण्यात यावी. याबाबत तातडीने कारवाई न झाल्यास जिल्ह्यातील प्रत्येक वसतीगृहासमोर विद्यार्थ्या समवेत काँग्रेस पक्षाच्या वतीने आदोलन छेडण्यात येईल अशा इशारावजा सुचना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांना निवेदनाद्वारे दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here