आदिवासी बांधवांनो भाजपच्या कपट कारस्थानांपासुन सावध रहा : आमदार सुभाष धोटे. 🔶सोनापूर येथे काँग्रेसच्या वतीने आदिवासी गौरव पर्वाचे आयोजन. 🔶मशाल मार्च, आदिवासी महापुरुषांना अभिवादन, लोककलांनी वेधले सर्वांचे लक्ष.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली राजुरा विधानसभा काँग्रेसच्या वतीने मौजा सोनापूर येथे सायंकाळी ७ वाजता पासून तर मध्यरात्री उशिरापर्यंत विविध दर्जेदार कार्यक्रमाने *आदिवासी गौरव पर्व* साजरा करण्यात आला.
सायंकाळी गडचांदूर – देवाळा राज्य मार्गावरील मुख्य प्रवेशद्वारापासून तर सोनापूर येथे भव्य मशाल मार्च काढण्यात आले. आदिवासी अस्मिता चेतवणारे नारे, लोकनृत्य यांचे सादरीकरण करून जनजागृती करण्यात आली. सर्व मान्यवरांनी आदिवासी दैवत, आदिवासी अस्मितेचे प्रतीक वीरांगणा राणी दुर्गावती, राणी हिराई, वीर बाबुराव शेडमाके, वीर बिरसा मुंडा, वीर शामादादा कोलाम, वीर कोमुराम भीम यांच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण, करून महापुरुषांना अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर आदिवासी समाज बांधवांसह सर्व काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांना संरक्षण प्रतिज्ञा देण्यात आली व आदिवासी समाजाचे कुठे शोषण होणार नाही आणि जर तसे झाले तर त्याचा प्रतिकार केला जाईल अशी ग्वाही देत संकल्प करण्यात आला. त्यानंतर विविध लोकनृत्य, गोंडी ढेमसा, घुसाळी, दंडार यांचे सादरीकरण करण्यात आले. घुसाळी या लोकनृत्यात सहभागी होऊन आ. धोटे यांनी लोककलावंतांचा उत्साह वाढविला. सामुहिक रात्रभोजन आटोपल्यावर दंडार व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यावेळी अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुक्कामी राहून कार्यक्रमांचा आस्वाद घेतला.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी आदिवासी बांधवांनी भाजपच्या कपट कारस्थानांपासुन सावध रहावे, हे लोक भोळ्या भाबड्या आदिवासी बांधवांचा केवळ मत घेण्यासाठी वापर करीत असून प्रत्यक्षात मात्र आदिवासी समाजाचे शोषण करीत आहेत. वास्तविक पाहता माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी, राजीव गांधी, मनमोहनसिंग आणि काँग्रेस पक्षाने विविध धोरणात्मक निर्णय, कायदे अमलात आणून आदिवासींना विकासाच्या प्रवाहात आनले आहे हे लक्षात घेतले पाहिजे. भाजप च्या अपप्रचाराला बडी न पडता आदिवासी महापुरुषांच्या प्रेरणेने अधिक प्रगती करा असा संदेश दिला.
या प्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नागरिक लिंगु पाटील कुमरे, जेष्ठ नेते माजी जि. प. सदस्य भीमराव पाटील मडावी, सिताराम कोडापे, नगराध्यक्षा सविता टेकाम, काँग्रेस तालुका अध्यक्ष रंजन लांडे, उत्तमराव पेचे, निर्मला कुळमेथे, नंदा मुसने, आशा खासरे, माजी जि प सदस्य नानाजी आदे, मेघा नलगे, माजी सभापती कुंदा जेणेकर, माजी प स सदस्य संभाजी पाटील कोवे, सोनापूर चे सरपंच जंगु पाटील वेडमे, शंकर गोनेलवार, सिताराम मडावी, मलकु पाटील कोटनाके, प्रभाकर उईके, दिलीप डोईफोडे, नारायण वाघमारे, दत्ता मसे, तिरुपती इंदुरवार, कविता उपरे, नगरसेवक सचिन भोयर, शहराध्यक्ष संतोष महाडोळे, यु. काँ महासचिव प्रणय लांडे, तालुकाध्यक्ष इर्षाद शेख, रोशन मरापे, यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून पारंपरिक लोककलांचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी केले, प्रास्ताविक भेंडवी चे सरपंच श्यामराव कोटनाके तर आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे यांनी केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *