सिनेकलावंत, तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत “अपना टाईम आयेगा” या नव्या सिनेमाचा मुहूर्त सोहळा संपन्न..!

 

लोकदर्शन मुंबई-परेल👉 -महेश्वर तेटांबे

विनोदी अभिनेते आणि लोकशाहीर स्वर्गीय दादा कोंडके यांच्या स्मृतींना अभिवादन करून देवाशिष प्रॉडक्शन आणि सनीबॉय एंटरटेनमेंट प्रस्तुत
रमेश यादव आणि किशोरी लिमकर निर्मित तसेच विनोदवीर सनीभूषण मुणगेकर आणि महेश्वर तेटांबे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून “अपना टाइम आयेगा” या मराठी सिनेमाचा मुहूर्त नुकताच परेल येथील सहकारी मनोरंजन या सभागृहात संपन्न झाला. याप्रसंगी अनेक दिग्गज मान्यवर कलावंत, तंत्रज्ञ, पत्रकार उपस्थित होते. या सिनेमाची कथा सनीभूषण मुणगेकर यांची असुन पटकथा सनीभूषण मुणगेकर आणि सुधीर आंबोले यांची आहे तर संवाद सुधीर आंबोले यांचे आहेत. दिग्दर्शक निखिल कटारे, सनीभूषण मुणगेकर, संगीतकार प्रविण डोणे, गीतकार सुधीर आंबोले (बाबू दादा), गायक प्रविण डोणे, प्रीती कोळी व किशोरी लिमकर, छायाचित्रण सिद्धार्थ बनसोडे व अविनाश लोहार, कला दिग्दर्शन अमित चव्हाण, सनीभूषण मुणगेकर व प्रणेश लोगडे, प्रसिद्ध समाज सेवक खलील शिरगांवकर, नृत्य दिग्दर्शन मनोज जाधव (MJ), संकलन नितीन जंगम, रेकॉर्डींग आणि डबिंग स्टुडिओ सेलेस्टा स्टुडिओ, तांडव स्टुडिओ (कोल्हापूर), रेकॉर्डीस्ट तुषार सावंत सर (संगीत विशारद) आणि प्रविण ऐवळे (कोल्हापूर), 5.1 रेकॉर्डींग सेलेस्टा स्टुडिओ, पार्श्वसंगीत नितीन जंगम, प्रविण डोणे, कलरिस्ट नितीन जंगम, रंगभूषा सचिन कुंभार व प्रविण गीरकर, वेषभूषा सतीश खवतोड व शिवा कुंभार, स्पॉट दादा हर्षद साळवे, प्रसिद्धी माध्यम महेश्वर तेटांबे, लाइट किशोर राऊत आणि मंडळी, प्रॉडक्शन मॅनेजर समीर काळबे, निर्मिती प्रमुख- राहुल पवार, पब्लिसिटी डिझाईन (सनी आर्ट्स) विवेक पारकर, शरदम पारकर आणि दिपश्री कवळे, प्रोपर्टी प्रणेश लोगडे यांचे सहकार्य त्याचप्रमाणे हनुमान पेरला आणि सहकार मनोरंजन यांचे विशेष योगदान लाभले असुन या सिनेमातील प्रमुख कलाकार सुनील पाटेकर, किशोरी लिमकर, सुजाता बत्तीन, माधुरा दंडवते, प्रविण डोणे, सुधीर आंबोले, महेश्वर तेटांबे, राहुल पवार, दिपश्री कवळे, सनीभूषण प्रमोद मुणगेकर, विक्रांत बोरकर, हर्षद साळवे, आकांक्षा पवार, लक्ष्मी गुप्ता, अंकिता म्हेतर, अमित चव्हाण, समीर काळबे, रोहित चव्हाण, नीलेश सातपुते, गौरव पाटील, हर्षल मिरगणे , प्रणेश लोगडे
नृत्य कलाकार संस्कृती कांबळी, नूपूर माळकर, अनिरुद्ध रावळे, स्वराज, रोहित चव्हाण आदी सर्व मंडळी उपस्थित होती अशा तऱ्हेने नव्या सिनेमाचा मुहूर्त सोहळा जल्लोषात संपन्न करण्यात आला.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *