सह्याद्री व्याघ्र प्रकल्प , लायन्स क्लब सावर्डे जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न*

 

लोकदर्शन सावर्डे 👉.-गुरुनाथ तिरपणकर

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, लायन्स क्लब ऑफ सावर्डे ,जिजाऊ ब्रिगेड, आणि निसर्ग सेवक चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्ह्यातील शिंदी ,आरव आणि वेळवणं या गावात जाऊन येथील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अधिकारी आणि निसर्ग प्रेमी श्री. निलेश बापट यांनी सदर गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याबाबत लायन्स क्लब चे अध्यक्ष डॉ. निलेश पाटील यांच्याशी चर्चा केली .आणि सामाजिक जाणीवेतून सहकार्य करण्याचे आश्वासन डॉ.निलेश पाटील यांनी दिले. लायन्स क्लबने सावर्डे परिसरातील डॉक्टर्स ,आणि जिजाऊ ब्रिगेड यांना आवाहन केले होते. त्याप्रमाणे सह्याद्री च्या कुशीत वसलेल्या आणि सातारा जिल्यात येणाऱ्या शिंदी गावातील ३३ नागरिकांची, वेळवण गावातील ४० आणि आरव गावातील ३० नागरिकांची अशी एकूण १०३ पुरुष व महिला नागरिकांची मोफत तपासणी करून त्यांना गरजेनुसार मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. सदर आरोग्य तपासणी वेळी त्वचा रोग तज्ञ् डॉ. सुचिता पाटील,अस्थिरोग तज्ञ् डॉ.पांडुरंग पाटील, बालरोगतज्ञ् डॉ. रघुनाथ तोडकर, स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ञ् डॉ.रश्मी पाटील तसेच चिरायू हॉस्पिटल सावर्डे च्या परिचारिका कुमारी सुजाता भुवड आणि सौ मेघना घाणेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रच्यावेळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे RFO श्री.बाळाकृष्ण हसबनीस, वनरक्षक श्री.सुरेश सूर्यवंशी, श्री.संदीप पवार, श्री.प्रतिक गायकवाड, निसर्ग प्रेमी श्री.निलेश बापट, लायन्स क्लब चे अध्यक्ष डॉ.निलेश पाटील, सचिव सतीश सावर्डेकर, MJF ला.गिरीश कोकाटे, ला.राजेश कोकाटे, ला.प्रकाश राजेशिर्के, ला.डॉ.वर्षा खानविलकर उपस्थित होते. सदर गावातील सरपंच श्री.दिनेश मोरे, गावातील प्रमुख श्री.सुरेश शेलार, दीपक शेलार, सुधीर मोरे, हेमांगी मोरे, तसेच गावातील नागरिकांनी सह्याद्रीच्या कुशीतील डोंगराळ आणि वन भागात येऊन आरोग्यविषयी सेवा दिल्याबद्दल लायन्स क्लब सावर्डे,जिजाऊ ब्रिगेड सावर्डे, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अधिकारी, सह्याद्री निसर्ग प्रेमी निलेश बापट, आणि सर्व डॉक्टर्स यांचे कौतुक करून आभार मानले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *