महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय,गडचांदूर येथे नियमित प्राचार्य म्हणून डॉ. शैलेंद्र देव रुजू*

 

लोकदर्शन 👉 प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर:
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपणा तालुक्यातील एकमेव अनुदानीत विज्ञान महाविद्यालय असलेले महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स,गडचांदूर या महाविद्यालयात गोंडवाना विद्यापीठातील सायन्स व टेक्नॉलॉजीचे अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र देव नियमित प्राचार्य म्हणून दिनांक 4 मे 2023 ला रुजू झाले आहेत.डॉक्टर शैलेंद्र देव यांनी याआधी शिंदे महाविद्यालय,भद्रावती येथे सेवा दिली आहे त्यानंतर गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे गणित विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. शिक्षण क्षेत्रात प्रदिर्घ काळाचा अनुभव असलेले व्यक्ती गडचांदूर सारख्या आदिवासी बहुल भागातल्या महविद्यालयात रुजू झाल्यामुळे प्राध्यापक व कर्मचाऱ्यात मोठा उत्साह निर्माण झाला आहे.महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयात विज्ञान ही एकमेव विद्याशाखा आहे.त्यामुळे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहेत,
डॉ. शैलेंद्र देव हे गोंडवाना विद्यापीठातविज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखा चे अधिष्ठाता तसेच संचालक विद्यार्थी विकास विभाग म्हणून सुद्धा कार्य केलेले आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण पाच विद्यार्थ्यांना पीएचडी प्राप्त झालेली आहे तसेच सहा विद्यार्थी पीएचडी चे संशोधन कार्य करीत आहे.त्यांना विद्यापीठाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे त्यांचे शंभरच्या वर संशोधन पर लेख व पाच पुस्तके प्रकाशित झालेले आहेत
डॉ. देव सर महाविद्यालयात रुजू होताच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले व पुढील महाविद्यालयीन कार्य प्राध्यापक व इतर कर्मचारी यांच्या सहकार्याने पार पाडली जातील, असा विश्वास नवनियक्त प्राचार्यांनी व्यक्त केला.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *