Home
Home Breaking News आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते जिवतीत विकासकामांचे भूमिपूजन.

आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते जिवतीत विकासकामांचे भूमिपूजन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

जिवती :– आदिवासी बहुल, अती दुर्गम जिवाती तालुक्यात विविध ठिकाणी स्थानिक विकास निधी २०२२-२३ अंतर्गत सामाजिक भवन बांधकामाच लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यात मौजा महराजगुडा येथे १० लक्ष, मौजा मुकुंदंगुडा येथे १० लक्ष, मौजा केकेझरी येथे १० लक्ष रुपये किंमतीच्या सामाजिक भवन निर्माण कार्याचे भुमीपुजन आज संपन्न झाले.
या प्रसंगी जिवती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणपत आडे, माजी उपसभापती सुग्रीव गोतावळे, माजी उपनगराध्यक्ष अशपाक शेख, संचालक कृ.उ.बा.स. उत्तम कराळे, मुकादमगुडा सरपंच लिंबादास पतंगे, नोकेवाडा उपसरपंच सुधीर जाधव, माजी सरपंच विजय राठोड, रामदास रणवीर, नारायण वाघमारे, विष्णू रेड्डी, दिवाकर वेट्टी, कैलाश कुंडगिर, वामन पवार, चंदू पवार, उत्तम थोरात, दिनेश पतंगे यासह नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here