लखमापूर येथील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या*

 

लोकदर्शन 👉प्रा. अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर:-
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना तालुक्यातील लखमापूर येथील विवाहीत शेतकऱ्यांने स्वतःच्या शेतात गळफास लावून आत्महत्या केली.
शुक्रवारला सकाळी ९ वाजता ही घटना उघडकीस आली सतीश पुंडलीक साळवे ३५ असे मृताचे नाव आहे.
ते स्वतःच्या ३ एकर शेतीत कापूस तूर व सोयाबीन उत्पन्न घेऊन परिवारांचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या सतीश पुंडलीक साळवे या शेतकऱ्यांनी दुष्काळ परिस्थितीमुळे सततच्या नापिकी आर्थिक संकट बँकेच्या कर्जामुळे स्वतःच्या शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली
त्यांच्या मागे पत्नी आई वडील मुलगा भाऊ असा बराच मोठा आप्त परिवार आहे या घटनेमुळे लखमापूर गावात शोककळा पसरली असून शुक्रवारला सायंकाळी ५ वाजता गावच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.पुढील तपास गडचांदूर पोलीस करीत आहे

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *