राजुरा, कोरपना कृ. उ. बा. समीतीवर काँगेसचा झेंडा.

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, कोरपना कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक निकालात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा झेंडा फडकविला आहे. राजुरा येथे काँग्रेस समर्पित शेतकरी परिवर्तन पॅनल च्या माध्यमातून येथे मागील १५ वर्षापासून वर्चस्व असलेल्या शेतकरी संघटनेच्या गडाला सुरूंग लावून १८ पैकी १० जागा जिंकून काँग्रेसने विजयाचा झेंडा फडकवीला आहे तर कोरपना येथे काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती करून एकूण १८ पैकी १३ जागा जिंकून झेंडा फडकविला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज जाहीर झालेल्या निकालात काँग्रेस समर्पित शेतकरी पॅनलचे राजुरा येथे काँग्रेसचे अॅड. अरूण मुरलीधर धोटे, उमाकांत मनोहर धांडे, विनोद गजानन झाडे, आशिष दिलीप नलगे, सरिता अजय रेड्डी, तिरुपती मल्लया इंदूरवार, जगदीश रामप्रसाद बुटले, विकास माधव देवाळकर, लहु काशिनाथ बोंडे, गोपाल नारायण झवर असे १० संचालक, भाजपचे सतिश लक्ष्मण कोमरवेल्लीवार, संजय मोरेश्वर पावडे, विठ्ठाबाई हरिदास झाडे, राकेश श्रीरंग हिंगाने, नवनाथ अंबादास पिंगे असे ५ संचालक, शे. संघटनेचे प्रफुल्ल निलकंठ कावळे, प्रभाकर मारोती ढवस, दिलीप नारायण देठे असे ३ संचालक निवडूण आले आहेत. तर कोरपना येथे गणेश श्रीधरराव गोडे, ज्ञानेश्वर तातोबा आवारी, नामदेव भोजु जुमनाके, अशोक चिंतामण बावणे, वंदना मुर्लिधर बल्की, विठाबाई महादेव देवाळकर, पुंडलिक माधव गिरसावळे, इरफान फुलमहमंद शेख, विनोद नरहरी नवले, राजीव पांडुरंग ढवळे, उत्तम शंकर कराळे, भालचंद्र बळीराम बोडखे, एजाज शेख असे १३, शेतकरी संघटनेचे सुनिल राजेश्वर बावणे, राजु पांडुरंग ढवळे, विकास तुळशिराम दिवे, दत्ता केरबा कांबळे असे ४, गोंडवाना गणतंत्र पार्टी चे निशिकांत रेश्माजी सोनकांबळे असे संचालक निवडून आले आहेत.
काँग्रेसच्या व काँग्रेस समर्पित शेतकरी परिवर्तन पॅनल च्या सर्व विजयी उमेदवारांचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी अभिनंदन केले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *