खैरगुडा येथे माजी नगराध्यक्ष अरुण धोटेंच्या हस्ते पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन. ♦️ग्रा. प. सदस्य स्वप्नील कोहपरे, मारोती आत्राम यासह अनेक युवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश.

लोकदर्शन 👉मोहन भारती

राजुरा :– राजुरा तालुक्यातील ग्रामपंचायत मंगी बुद्रुक अंतर्गत मौजा खैरगुडा येथे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नांतून मंजूर करण्यात आलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना बांधकामाचे भूमिपूजन माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी प्रमुख अतिथी माजी जि प सदस्य भिमराव पुसाम, काँग्रेस शहराध्यक्ष संतोष गटलेवार, सरपंच शंकर तोडासे, ग्रा. प. सदस्य रामभाऊ तलांडे, स्वप्नील कोहपरे, मारोती आत्राम, अक्षय दरने, चंदु बुजाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी खैरगुडा येथील ग्रा. प. सदस्य स्वप्नील कोहपरे, मारोती आत्राम यासह सुरज सूरकर, राकेश मडावी, तुळशीराम चनकापुरे, राहुल चौधरी, विजय बोरकुटे, सुमित कोहपरे, आशिष कोहपरे, प्रकाश सातपुते, शुभम चनकापुरे, श्रीराम चनकापुरे, सिद्धांत चनकापुरे, प्रेम सातपुते, राजकुमार आत्राम, आशिष कोहपरे, योगेश भटारकर, सौरभ ठाकरे, अजय चौधरी, रितिक भटारकर, प्रतीक भटारकर, श्रीकांत आत्राम, नवनाथ आत्राम, कवडु एकोनकर, विजय भटारकर, प्रवीण कुळसंगे, सुरज आत्राम, सुमित सोयम, आशिष चनकापुरे, शशिकांत सातपुते, मंगेश सातपुते, अविनाश सातपुते, मधुकर कोहपरे, रवींद्र सातपुते आणि अनेक युवकांनी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन काँगेस पक्षात प्रवेश केला. सर्व नवप्रवेशीत युवकांचे काँग्रेस पक्षाचे दुप्पटे देऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी खैरगुडा येथील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here