निती निकेतन बहूउद्देशीय शिक्षण संस्था वाघोली संचलित मातोश्री रेवम्मा मुलींचे खुले निवारागृहमध्ये जिया जुमानी या चिमुकलीचा चौथा वाढदिवस मोठ्या उत्साहात सम्पन्न.

लोकदर्शन पुणे 👉 राहुल खरात

केंद्रशासनाच्या मान्यतेने पुणे महानगरपालिका क्षेत्रात गंगानगर फुरसंगी येथे मातोश्री रेवम्मा मुलींचे खुले निवारागृह ही संस्था कार्यरत आहें. या संस्थेमध्ये पुणे महानगरपालिका या क्षेत्रातातील रस्त्यावर राहणाऱ्या आणि भिक्षेकरी मुली, बालकामगार मुली, अनाथ मुली, निर्जन आणि पळून आलेल्या मुली, झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या मुली, सामाजिक दृष्टीने उपेक्षित गटातील मुली अश्या मुलींना संस्थेमध्ये प्रवेश देऊन त्यांना अन्न, वस्त्र, निवारा आणि व्यासायिक प्रशिक्षण देऊन त्या मुलींचे पुनर्व्हसन करण्यासाठी प्रयत्न केली जातात.मातोश्री रेवम्मा मुलींचे खुले निवारागृह ही संस्था दोन वर्षापासून उत्कृष्ट पद्धतीने आपले काम करत आहें. आज रोजी जिया जुमानी या चिमुकलीचा चौथा वाढदिवस केक कट करून मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी जिया ची आई समाजसेविका करिष्मा जुमानी, डिम्पल वाढवानी, सोनम बेताई मातोश्री रेवम्मा च्या सचिव गोदावरी द्याडे तसेच कर्मचारी वनिता रणदिवे, स्नेहा मडावी, मंदा तळपाडे, सोनाली बनसोडे, दीपिका अलगुले, प्राजक्ता थोरात, संस्थेतील दाखल मुली उपस्थित होत्या. शेवटी सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here