जि. प. हायस्कूल शाळा कन्हाळगाव येथे सेमी इंग्रजी माध्यमाला मान्यता ♦️जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव शाळेला विविध सोई सुविधा मिळाल्या बद्दल महाराष्ट्र शासनाचे खूप खूप आभार ♦️श्री नारायण हिवरकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी मानले

लोकदर्शन 👉 मोहन भारती

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्हाळगाव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री नारायण हिवरकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष होते कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री स्वतंत्रकुमार शुक्ला मुख्याध्यापक प्रमुख पाहुणे सौ पुष्पाताई सोयाम मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्हाळगाव,श्री डोहे सर,सौ मडावी मॅडम,श्री जिवणे सर,श्री जुनगरी सर,सौ बोधाने मॅडम,कु अफसाना मॅडम भगत मॅडम मनवर,सौ ताराबाई मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते श्री नारायण हिवरकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी सेमी इंग्रजी माध्यमाच्या बॅनर चे अनावरण करुन उद्घाटन केले तसेच डब्लु सि एल च्या वतीने सि एस आर फंडातून दोन विद्यार्थ्यांना झी व निट परीक्षेसाठी निवड नागपूर येथे दोन वर्षा साठी पाच लाख रुपये खर्चास मंजुरी मिळाल्याबद्दल श्री नारायण हिवरकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी कु पवित्रा देवतळे व महेश चौधरी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आपल्या मनोगतात श्री नारायण हिवरकर यांनी जिल्हा परिषद हायस्कूल शाळेला महाराष्ट्र शासनाने लाब्ररी,दाहा काम्पुटर,झी व निट मोफत शिक्षणासाठी दोन विद्यार्थ्यांची निवड झाली अशा अनेक शाळेला सोई सुविधा मिळाल्या बद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार मानले व कर्तव्य दक्ष श्री स्वतंत्रकुमार शुक्ला सर मुख्याध्यापक यांच्या कार्याचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी,नागरिक कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन श्री जिवने सर यांनी केले तर आभार जुनगरी सर यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here