रमजान ईद हा विश्व शांती, सामाजिक कल्याण व बंधुत्व जोपासणारा पवित्र पर्व-आ. सौ. सुलभाताई खोडके* *♦️आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी शहरातील ईद मिलन कार्यक्रमात शिरकत करून दिली मुबारकबाद*

 

लोकदर्शन👉 प्रतिनिधी,(संकलन)

*अमरावती २२ एप्रिल* : मुस्लिम कॅलेंडर नुसार ३० वा रोजा पूर्ण होताच व शुक्रवारी चंद्रदर्शन झाल्याने शनिवार २२ एप्रिल रोजी सर्वत्र ईद-उल- फितर म्हणजेच रमजान ईद मोठ्या हर्षोल्लासात साजरी करण्यात आली. या पावन पर्वावर अमरावतीच्या आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी शहरातील पठाण चौक येथे आयोजित ईद मिलन कार्यक्रमात शिरकत करून समस्त मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान ईद उत्सवाची मुबारक बाद दिली. रमजानचा पवित्र महिना हा समस्त मुस्लिम बांधवांसाठी प्रार्थना आणि पावित्र्याचा महिना म्हणून ओळखला जातो. उपवास, इबादत ,क्षमायाचना व मंगल कामना करण्याला घेऊन रमजान महिन्याला महत्व आहे.तसेच विश्व शांती, अमन व भाईचारा, सामाजिक समरसता प्रस्तापित करण्याचा रमजान ईद हा पर्व आहे. सर्वत्र सामाजिक बंधुत्व व मानवता नांदत राहो, प्रत्येकाची प्रगती व कल्याण होवो, अशा शब्दात आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी समस्त मुस्लिम अनुयांना रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या.
शनिवारी सकाळी ईद ची नमाज अदा होताच मुस्लिम बांधवांचे जत्थे च्या जत्थे पठाण चौक स्थित ईद मिलन कार्यक्रम स्थळी उसळले होते . यावेळी आमदार महोदयांनी मुस्लिम अनुयांना गुलाब पुष्प देऊन त्यांना मुबारकबाद दिली . रमजान ईद निमित्य अबाल वृद्धांमध्ये सुद्धा प्रचंड हर्षोल्हास दिसून आला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, विधिमंडळ समनवयक,प्रवक्ते,-संजय खोडके, यश खोडके यांनी सर्व मुस्लिम समाज बांधवांना पवित्र रमजान ईद निमित्ताने शुभेच्छा दिल्या. तसेच गळा भेट घेऊन ईद च्या उत्सवात सम्मिलीत झाले. तसेच आ.सौ.सुलभाताई खोडके यांनी मुस्लिम बहुल भागातील गणमान्य नागरिकांच्या घरी भेट देऊन ईद मिलन साजरा करीत मुबारकबाद दिली. यावेळी सुकामेवा व मिठाई देऊन इफ्तार सुद्धा करण्यात आला .
यावेळी आमदार सौ.सुलभाताई खोडके समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, विधिमंडळ समनवयक,प्रवक्ते- संजय खोडके, यश खोडके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष-प्रशांत डवरे,माजी महापौर-ऍड.किशोर शेळके, हफिज कारी सैयद अख्तर , मुझ्झफर अहमद मामू ,राष्ट्रीय एकता मंच चे – सुरेश रतावा, दंतरोग तज्ञ-डॉ. सैयद अबरार, सनाउल्लाखान ठेकेदार, गाझी जहरोष, सनाउल्ला सर, नादिममुल्ला सर, हबिबखान ठेकेदार, सैयद साबीर,अफसर बेग,फारुखभाई मंडपवाले,अबरार भाई,मोईन खान,साबीर पहेलवान, फहिम मेकॅनिक,सादिक रजा,वहिदखान,मोहम्मद शारीक, परवेज खान,हब्बू भाई,बिलाल भाई,दिलबर शाह,सनी भैया,सादिक कुरेशी,राजू पहेलवान, भुरू भाई,तनविर आलम,नसीम पठाण,हाजी रफीकभाई,सत्तारभाई राराणी,आतिफ नवाज,हाफिज नाजी,आसिफ मंसुरी,आहद अली काजी,सादिकभाई आयडिया, बबलू अंपायर,वहिद शाह,फिरोज शाह,अशोक हजारे,गजानन बरडे,जितेंद्रसिंह ठाकूर,सुनील रायटे,माजी नगरसेवक-रतन पहेलवान डेंडूले,विजय बाभूळकर,दिनेश देशमुख, पप्पूसेठ खत्री, ऍड. सुनील बोळे, प्रमोद सांगोले,दीपक कोरपे,ऋतुराज राऊत,जवाहर व्यास,मनीष देशमुख, मनोज केवले,किशोर भुयार,किशोर देशमुख, प्रशांत पेठे,प्रा. डॉ. अजय बोन्डे,भोजराज काळे,दिलीप कडू, प्रमोद महल्ले,योगेश सवई,आकाश वडणेरकर, सुयोग तायडे,प्रवीण भोरे,श्रीकांत झंवर, मनीष करवा, आनंद मिश्रा, सादिक रजा , मनीष बजाज,भूषण बनसोड,राजेश कोरडे,गुड्डू धर्माळे,निलेश शर्मा,कर्नालसिंग राहल,पिंटू मानकर,शुभम पारोदे,अमोल देशमुख, प्रशांत यावले,गोपाल चिखलकर, ऍड. अमित जामठीकर,पंकज थोरात,राजेंद्र कुर्हेकर, सागर इंगळे,किशोर चव्हाण,प्रज्वल भामोदकर, मनीष इंगोले,सुरेश चौधरी, शिवपाल ठाकूर,सतीश चरपे,प्रदीप नानोटे, मनीष पाटील,जयेश सोनोने,दीपक खंडारे,अक्षय पळसकर,अदनान हुसेन,सतीश चरपे आदीसहित अन्य मान्यवर व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *