कोरपना येथे हिरो शोरूम ला भीषण आग ♦️संपूर्ण शोरूम बेचिराख ; कोट्यावधीचे नुकसान

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

कोरपना – कोरपना येथील चंद्रपूर महामार्गावरील आदर्श टू व्हीलर गाड्यांच्या हिरो शोरूम ला बुधवारी मध्यरात्री दरम्यान अचानक रित्या भीषण आग लागल्याने संपूर्ण शोरूम मधील साहित्यांची राख रांगोळी झाली. यात शोरूमचे करोडो रुपयांचे नुकसान झाले.
मध्यरात्री दरम्यान लागलेल्या आगीत शोरूम मधील नव्या कोऱ्या गाड्या , टू व्हीलर चे ॲक्सेसरीज , शोरूमची कागदपत्रे , इलेक्ट्रॉनिक वस्तू, संगणक आदी साहित्य पूर्णत जळून खाक झाले. त्यामुळे शोरूमचे मोठे नुकसान झाले. ही आग शॉर्टसर्किट की नेमकी अन्य कशामुळे लागली हे अजूनही स्पष्ट झाले नाही. शोरूम ला लागलेल्या आगीवर अग्निशामक माध्यमातून आग विजवण्यात यश आले आहे. हे शोरुम कोरपना येथील सुहेल आबिद अली यांच्या मालकीचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here