*राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ जिल्हा नांदेड येथील कार्यालयात बैठक संपन्न…* —————————————- *♦️राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा आगामी “वर्धापन दिन सोहळा” होणार नांदेड येथे साजरा…*

—————————————-
लोकदर्शन नांदेड:-👉 राहुल खरात

नांदेड येथील जिल्हा कार्यालयात राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष शंकर सिंह ठाकुर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मराठवाडा कार्याध्यक्ष प्रकाशजी कोल्हे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष मारोती शिकारे यांच्या उपस्थितीत आज दि.०२ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठक चालू असताना नांदेड जिल्हा अध्यक्ष शंकरसिंह ठाकूर यांनी संस्थापक अध्यक्ष विजयजी सुर्यवंशी यांच्याशी भ्रमणध्वनी व्दारे संपर्क साधून येणारा आगामी वर्धापन दिन आम्ही नांदेड येथे भव्य दिव्य स्वरूपात साजरा करणार आहोत त्यासाठी आपण आम्हास परवाणगी द्यावी असे म्हणाले असता संस्थापक अध्यक्षांनी त्यांच्या शब्दास मान देऊन लगेचच होकार दिला असल्याचे जिल्हा अध्यक्ष शंकरसिंह ठाकुर यांनी उपस्थित पदाधिकारी यांना सांगितले असता बैठकीत सर्वांनी या निर्णयाचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
सदरील बैठकीस राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे अनेक पत्रकार बांधव व राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित विविध समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठक चालू असताना अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या संघाची “गाव तिथे पुरोगामी पत्रकार संघाची शाखा ” गाव तिथे पुरोगामी संकल्पना साकार झाली पाहिजे. यावर मराठवाडा कार्याध्यक्ष प्रकाशजी कोल्हे यांनी प्रकाश टाकला. नांदेड जिल्हा अध्यक्ष शंकरसिंह ठाकूर यांनी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ वाढी साठी आपली या पुढील दिशा कशी असेल यावर त्यांनी मार्गदर्शन केले. नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष मारोती शिकारे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना नांदेड जिल्हा अध्यक्ष शंकरसिंह ठाकूर यांची परवानगी घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा येणारा “वर्धापन दिन सोहळा” आपण नांदेड येथे साजरा करू अशी भावना व्यक्त केली. यावर सर्वांनी आपली सहमती दर्शविली व येणारा राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा “वर्धापन दिन सोहळा” नांदेड येथे साजरा करण्या बाबत ठरले व याबाबत शनिवार दिनांक ०८ एप्रिल २०२३ रोजी होणाऱ्या संघांच्या ऑनलाइन बैठकीत घोषणा करण्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी नांदेड जिल्हा संघटक सुनिल जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानून बैठक संपल्याचे जाहीर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here