



लोकदर्शन 👉 मोहन भारती
छत्रपती शिवाजी महाराज व महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी चांगलेच अडचणीत आले आहेत. दिल्लीतून कोणत्याही क्षणी त्यांच्या राजीनामा घेतला जाऊ शकतो. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून कॅप्टन अमरिंदर सिंग यांची नियुक्ती होण्याची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यादरम्यान झालेल्या भेटीत कोश्यारी यांनी राज्यपाल पदावरून पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर महाराष्ट्रात नव्या राज्यपालांची नियुक्ती करण्याबाबत दिल्लीत वेगवान घडामोडी घडत आहेत.