इन्फंट कॉन्व्हेंट येथे ‘ फॅमिली फन डे ‘ कार्यक्रमाचे आयोजन. विद्यार्थ्यांनी घेतला आई – वडीलांसह खेळांचा आनंद.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे इयत्ता पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ फॅमिली फन डे ‘ कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या आई – वडीलांसह विविध खेळांचा आनंद घेतला. या उपक्रमाबाबत अनेक विद्यार्थ्यांच्या आई वडीलांनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा एकदा शाळेचे दिवस आठवले आणि खुप छान अनुभव मिळाला अशा भावना व्यक्त केल्या.
या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *