चौकातील ‘ती’ मुले कोणत्या देशाची..?

By : Shankar Tadas

नागपूर :

7 जानेवारीला नागपूर येथे दुपारी 3 वाजता लोकमत चौकातील प्रसंग. मी आणि माझी मुलगी ऑटोत बसून निघालो होतो बर्डीकडे. तेथे थांबलेल्या वाहनाची काच पुसून भीक मागणारा एक बारा ते चौदा वर्षीय मुलगा पाहिला. अगदीच केस रंगवून स्टाईलमध्ये होता. ही मुले योग्य दिशेने गेली तर देशाकरिता खूपकाही करू शकतात. कारण ते रस्त्यात भीक मागू शकतात. त्यांच्यात धीटपणा आहे. ते प्रसंगी गळेही कापू शकतात. त्यांच्यात सामर्थ्य आहे. बालकल्याण, युवककल्याण अशी नावे असलेल्या कित्येक शासकीय योजना आणि NGO आपल्या देशात आहेत. त्यांची पोहोच या मुलांपर्यंत का नाही.. असा प्रश्न प्रत्येक सुज्ञ नागरिकाला पडतो… नव्हे पडलाच पाहिजे. अन्यथा आपण मुर्दाड आहोत. त्याच मार्गाने आमचे पुढारी आणि अधिकारी ये-जा करतात. त्यांचे प्रथम कर्तव्य आहे, या समस्येवर उपाय करणे. याबद्दल सविस्तर बातमी सकाळ या दैनिकाने दीड वर्षापूर्वी दिली होती. त्यावर काहीतरी नक्कीच झाले असेल. पुन्हा तीच समस्या.एखाद्या मोठ्या वृत्तपत्राने लिहिले तरी शांत राहणारी दगडी व्यवस्था लोकशाहीसाठी लज्जास्पद नव्हे अत्यंत भयावहसुद्धा आहे.

 

#nagpurbeggerboy

#lokdarshanshankartadad

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *