



By : Ajay Gayakwad
वाशिम :
मालेगाव तालुका विधिज्ञ मंडळाची 2023 या वर्षासाठीची नवीन कार्यकारिणी घोषित झाली असून यामध्ये अध्यक्षपदी ॲड इम्रान मौला सय्यद ,उपाध्यक्ष ॲड दिनेश माटोले तर सचिव पदी ॲड सतीश मगर यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.
7 जानेवारी रोजी मालेगाव न्यायालयातील एडवोकेट हॉलमध्ये सन 2023या वर्षासाठी मालेगाव तालुका विधिज्ञ मंडळ कार्यकारणीसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सर्वानुमते बिनविरोध कार्यकारणी घोषित करण्यात आली कार्यकारिणीची निवड एडवोकेट शंकरराव मगर मावळते अध्यक्ष यांनी जाहीर करून निवडीचे प्रमाणपत्र दिले.
यावेळी मालेगाव तालुका विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष म्हणून ॲड इम्रान मौला सय्यद उपाध्यक्ष ॲड दिनेश माटोले सचिव ॲड सतीश मगर , सहसचिव ॲड संदीप बोरचाटे कोषाध्यक्ष ॲड मीनेश खिल्लारे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष व सचिव यांचे उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी मालेगाव तालुका विधिज्ञ मंडळाचे माजी अध्यक्ष सचिव तसेच सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.