Home
Home Breaking News महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर चे उपप्राचार्य विजय आकनूरवार सेवानिवृत्त,,, ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, कनिष्ठ...

महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर चे उपप्राचार्य विजय आकनूरवार सेवानिवृत्त,,, ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, कनिष्ठ महाविद्यालयात सपत्नीक सत्कार करून निरोप दिला

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथील उपप्राचार्य विजय आकनूरवार प्रदीर्घ सेवेनंतर 31 डिसेंबर ला सेवानिवृत्त झाले.
कनिष्ठ महाविद्यालय च्या वतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करून भावपूर्ण निरोप दिला,
या सत्कार व निरोप समारंभ च्या अध्यक्ष स्थानी गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा व मुल्यमापन मंडळचे संचालक तथा संस्था संचालक डॉ अनिल चिताडे होते,प्रमुख पाहुणे म्हणून सौ प्रतिभाताई धोटे,संस्था चे प्रभारी सचिव धनंजय गोरे,जेष्ठ संचालक विठ्ठलराव थिपे, विकास भोजेकर, रामचंद्र सोनपितरे ,श्रीमती उज्वलाताई धोटे,प्राचार्या सौ स्मिताताई चिताडे,उपमुख्याध्यापक अनिल काकडे,पर्यवेक्षक एच बी मस्की ,सत्कारमूर्ती उपप्राचार्य विजय आकनूरवार,सौ नयनाताई आकनूरवार होत्या.याप्रसंगी प्रा आशीष देरकर,प्रा नंदा भोयर,प्रा अशोक डोईफोडे, डॉ यश आकनूरवार, यांनी सेवानिवृत्त उपप्राचार्य विजय आकनूरवार यांच्या कार्याचा गौरव केला, याप्रसंगी सेवानिवृत्त उपप्राचार्य विजय आकनूरवार व सौ नयना आकनूरवार यांचा कनिष्ठ महाविद्यालय च्या वतीने शाल,श्रीफळ, व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले, प्रा डॉ शरद बेलोरकर परीवार च्या वतीने सुद्धा त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला,
उपस्थित मान्यवरांनी उपप्राचार्य विजय आकनूरवार यांच्या शैक्षणिक,सांस्कृतिक, सामाजिक कार्याची प्रशंसा करून सुदृढ निरोगीआयुष्याकरीता तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या,प्रा विजय आकनूरवार यांनी सत्काराला उत्तर देताना संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त करून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी चे आभार मानले,
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा प्रफुल्ल माहुरे यांनी केले, परिचय प्रा प्रदीप परसुटकर यांनी करून दिला ,संचालन प्रा सुधीर थिपे यांनी केले तर आभार प्रा प्रगती आगे यांनी मानले,कार्यक्रमात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहपरिवार उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here