२९ ऑक्टोबर* *जागतिक स्ट्रोक दिवस* *World stroke day 2022*

 

*लोकदर्शन 👉 संकलन व संकल्पना
अनिल देशपांडे बार्शी
९४२३३३२२३३

स्ट्रोक येण्यापूर्वी शरीरात असे बदल दिसतात

स्ट्रोकमुळे संपूर्ण जगभरात लाखो लोकांना मृत्यू होतो. मेंदूच्या विशिष्ठ भागांपर्यंत रक्त पुरवठा न झाल्यास स्ट्रोकची समस्या उद्भवते. लक्षणं दिसल्यानंतर मेंदूच्या कोणत्या भागात रक्त पुरवठा बंद झाला आहे, याबाबत माहिती मिळते…

स्ट्रोकची संख्या दरवर्षी वाढत असून ही मोठी चिंतेची बाब बनली आहे. त्यामुळे हे गंभीर संकट आणि वाढत्या केसेस लक्षात घेऊन स्ट्रोकबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी ‘स्ट्रोक डे’ साजरा केला जातो. जागतिक स्ट्रोक दिवस दरवर्षी 29 ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो.

कर्करोग, मधुमेह, हृदयविकार यासारख्या गंभीर आजारांच्या तुलनेत ब्रेन स्ट्रोकचा उल्लेख फार कमी होतो. परंतु, हा आजार अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून भारतात दर मिनिटाला सहा व्यक्तींना ब्रेन स्ट्रोक होतो. हा आकडा एक वर्षात सुमारे २० लाखापर्यंत पोहोचतो व त्यापैकी जवळपास ७ लाख व्यक्तींचा मृत्यू होतो. धक्कादायक बाब म्हणजे, भारतातील ब्रेन स्ट्रोकग्रस्त नागरिकांपैकी २० टक्के नागरिकांचे वय ४० वर्षापेक्षा कमी आहे.जागतिक न्यूरोलॉजी महासंघाच्या ट्रॉपिकल न्यूरोलॉजी ग्रुपचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी जागतिक स्ट्रोक दिवसानिमित्त ही माहिती दिली. गेल्या २५ वर्षात ब्रेन स्ट्रोकचे प्रमाण वाढले आहे. जगात प्रत्येक दोन सेकंदात एका व्यक्तीला ब्रेन स्ट्रोक होतो. त्यातील ८० टक्के व्यक्ती अल्प व मध्यम उत्पन्न गटातील असतात. ब्रेन स्ट्रोक कोणत्याही वयात व कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो, पण ब्रेन स्ट्रोकचे प्रमाण महिलांमध्ये अधिक आहे. स्ट्रोक झाल्यानंतर ३० टक्के व्यक्तींचा मृत्यू होतो तर, ३० टक्के व्यक्तींना दीर्घकालीन अपंगत्व येते. उच्च रक्तदाब, धूम्रपान, मधुमेह, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, मानसिक तणाव, उच्च कोलेस्ट्रॉल, चुकीची आहार पद्धती, मद्यप्राशन, हृदयरोग, प्रदूषण इत्यादी कारणांमुळे ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो. ही कारणे टाळल्यास ब्रेन स्ट्रोकला लांब ठेवता येऊ शकते. रोज एक तास चालल्यास ब्रेन स्ट्रोकचा धोका ३० टक्क्यांनी कमी होतो.

*यंदाच्या जागतिक स्ट्रोक दिनाची थीम ‘त्याच्या लक्षणांबद्दल माहिती पसरवणे’ अशी आहे.*

जेणेकरुन स्ट्रोकच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी लोकांना अगोदरच जाणीव होऊन त्यांचे प्राण वाचवता येतील. या दिवशी दरवर्षी अनेक देशांमध्ये स्ट्रोक संदर्भात अनेक मोहिमा आयोजित केल्या जातात आणि विविध उपक्रम साजरे केले जातात.

२९ ऑक्टोबर रोजी, WHO ने स्ट्रोक प्रतिबंधक माहितीसाठी एक जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, जेणेकरुन ज्या लोकांना स्ट्रोकचा धोका असेल त्यांना त्वरित मदत मिळू शकेल, तसेच लोकांमध्ये स्ट्रोकच्या लक्षणांबाबत जनजागृती करता येईल.

स्ट्रोकमुळे संपूर्ण जगभरात लाखो लोकांना मृत्यू होतो. मेंदूच्या विशिष्ठ भागांपर्यंत रक्त पुरवठा न झाल्यास स्ट्रोकची समस्या उद्भवते. लक्षणं दिसल्यानंतर मेंदूच्या कोणत्या भागात रक्त पुरवठा बंद झाला आहे, याबाबत माहिती मिळते. न्यूरोलॉजिकल डिसॉर्डर असल्यास लक्षणांवरून शरीरात कोणत्या आजाराचा शिरकाव झाला आहे याबाबत अंदाज लावता येऊ शकतो.

*प्रत्येकासाठी हृदय तपासणी आवश्यक आहे का?*

हृदयरोगतज्ज्ञ सांगतात की, आजच्या युगात सर्व वयोगटातील लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. सर्व लोकांनी वेळोवेळी हृदय तपासणी करून घ्यावी. याशिवाय जिममध्ये जाण्यापूर्वी हृदयरोगतज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. याशिवाय सर्व लोकांना झोपण्याची आणि उठण्याची योग्य वेळ ठरवावी लागते. खाण्यापिण्याबाबत काळजी घ्यावी लागेल. जंक फूड टाळावे लागते. तणावाचे व्यवस्थापन करणे खूप महत्वाचे आहे. दररोज 40 मिनिटांत किमान 4 किमी चालले पाहिजे. धूम्रपान आणि अल्कोहोलपासून दूर राहणे फायदेशीर आहे.

*काही लक्षणे*

शरीराच्या काही भागात सुन्न वाटणं, मुंग्या येणं, चालायला त्रास होणं, स्वतःच्या शरीराचा बॅलेन्स सांभाळता न येणं ही लक्षणं दिसून येतात.

*आर्म वीकनेस*
– कोणत्याही व्यक्तीला दोन हात वर उचलण्यास त्रास होत असते. हातांना व्यवस्थित बॅलेन्स करता येत नसेल तर स्ट्रोकचे लक्षण असू शकते.

*फेस ड्रूपिंग*
– हसताना व्यक्तीचा चेहरा एका बाजूला वळत असेल तर या आजाराचा धोका असू शकतो. सामान्य स्थितीत न राहता अनेकदा हसताना चेहरा वाकडा होतो

*तुम्ही स्ट्रोक डे कसा साजरा करू शकता?*

‘स्ट्रोक डे’साठी पोस्टर बनवून लावू शकतो किंवा सोशल मीडियावर पोस्ट करून त्यासंबंधीची माहिती सर्जनशीलतेद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवता येऊ शकेल.

*स्ट्रोक डेच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारे तुमचे आवश्यक योगदान देऊ शकता.*

स्ट्रोकशी संबंधित अनेक मोठे इव्हेंट्स आहेत, तुम्ही त्यात सहभागी होऊ शकता.

जागतिक स्ट्रोक दिवसानिमित्त विविध मोहिमा सुरू केल्या जातात. त्याची माहिती तुम्ही
मित्र-नातेवाईकांना देऊन त्यांना सावध करू शकता.

तुम्हीही अशा मोहिमांचा एक भाग बनून तुमच्या वतीने योगदान देऊ शकता.
संकलन व संकल्पना
अनिल देशपांडे बार्शी
९४२३३३२२३३
माहिती स्रोत
नेट

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *