आ. सुभाष धोटेंनी जाणल्या शेतकऱ्यांच्या व्यथा : अन्याय दूर करण्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या सुचना.

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

कोरपना :– कोरपना तालुक्यातील मौजा भोयगांव, भारोसा, एकोडी, सांगोडा, अंतरगाव, कोडासी (बु), कोडसी (खुर्द), या पैनगंगा नदीच्या गावातील अतिवृष्टी व पुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आमदार सुभाष धोटे यांची कोरपना येथे भेट घेऊन अतिवृष्टी व पुरपरीस्थितीची सरकारी नुकसान भरपाई अल्पशा प्रमाणात मिळाल्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय झाला असल्याची बाब लक्षात आणून दिली. त्यावर आ. धोटे यांनी त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शेतकऱ्यांवरील हा अन्याय दूर करण्याची मागणी केली. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, नायब तहसीलदार पाटील यांच्याकडे जेष्ठ नेते सुरेश पा मालेकर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाला पाठवून निवेदन देऊन अन्याय दूर करण्याची मागणी केली. या शिष्टमंडळाने सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर योग्य कार्यवाही करून मदत केली जाईल असे आश्वासन दिले आहे.
या प्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजय बावणे, तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, जेष्ठ कार्यकर्ते सुरेश पा मालेकर, उपसभापती संभाजी कोवे, गणेश गोडे, अनिल गोंडे, सगिद रफिक शेख, संजय जाधव, प्रकाश मेश्राम, इस्तरीवार मारुती गोगलवार, शालिक दूरलावार, जयवंत देवलगडे यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *