



लोकदर्शन 👉 मोहन भारती
नवी दिल्ली : इंदूरच्या आठ वेळा खासदार राहिलेल्या सुमित्रा महाजन ‘ताई’ यांचे राजकीय पुनर्वसन महाराष्ट्राच्या राज्यपालपदी होऊ शकते. त्यावर भाजपच्या केंद्रीय समितीत विचार केला जात आहे. दुसरीकडे, मध्य प्रदेशच्या खासदार असलेल्या माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनाही मोठ्या राज्याच्या राज्यपालपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते.
1989 ते 2014 या काळात लोकसभा निवडणुकीत सातत्याने खासदार म्हणून निवडून आलेल्या ‘ताईं’नी 2019 ची लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिल्याने भाजपने त्यांच्या नावाची घोषणा करण्यास विलंब केला होता. गेल्या आठ निवडणुकांमध्ये भाजपच्या पहिल्या किंवा दुसऱ्या यादीत ताईंचे नाव घोषित व्हायचे. यावेळी वयाच्या 75 फॉर्म्युला आल्याने ‘ताई’ निवडणूक लढवणार की नाही याबाबत निवडणुकीपूर्वी अटकळ बांधली जात होती.