*धम्म चक्र प्रवर्तन दिनी प्रा.राजा जगताप यांच्या “गाव तेथे बुद्ध विहार”कादंबरीला राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त*

लोकदर्शन ढोकी👉 राहुल खरात

दि.५ उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी(बें)येथील व सध्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातीव वरिष्ठ विभागातील मराठी विषयाचे प्रा.राजा जगताप यांची “गाव तेथे बुध्द विहार”कादंबरी कमी कालावधित खूपच लोकप्रिय ठरली असून गाव खेड्यातील वाचकांनी कादंबरीला पसंती दिल्याने कादंबरीला राज्यभरातील वाचक मिळाला आहे.कांही दिवसापूर्वी जयभवानी नगर ढोकी येथील श्रावस्ती बुध्द विहारात कादंबरीचे सामुहिक वाचन करण्यात आले होते.आज जगाला बुध्दाच्या शांतीची गरज आहे व तरूणात संस्कार होण्याची गरज आहे.ही कादंबरी तरूणाला प्रेरणा देणारी असल्याने कादंबरीचा व लेखकाचा सन्मान व्हावा म्हणून ढोकी येथील, अखिल भारतीय बौध्द समाज कल्यान संघटना व जय भवानी नगर येथील श्रावस्ती बौध्द विहार कमिटिच्या वतीने ५सप्टेंबर रोजी,६६व्या धम्म चक्र प्रवर्तन दिनी कादंबरीला राज्यस्तरीय पुरस्कार २०२२देऊन प्रा.राजा जगताप यांना गौरविण्यात आले आहे.सदर पुरस्कार अखिल भारतीय बौध्द समाज कल्यान संघटनेच्या अध्यक्षा मा.जयश्री आप्पा कांबळे, मा.उपाध्यक्षा मा.मायादेवी बिभीषण इंगळे, मा.सचिव माया सतिश सोनटक्के,आप्पा कांबळे यांचे हस्ते देण्यात आला.अध्यक्षस्थानी ढोकी येथील माजी उपसरपंच मा.आप्पा कांबळे होते.प्रमुख पाहूणे म्हणून पुणे येथील एस.एन.डी.महाविद्यालयातील मानशास्ञ विषयाचे प्रा.डाॅ.चाबुकस्वार होते.यावेळी उस्मानाबाद येथील बाळासाहेब माने उपस्थित होते.
प्रारंभी बुध्द विहारात पंचशील ध्वजाचे अनावरन प्रा.डाॅ.चाबुकस्वार,प्रा.राजा जगताप यांच्या हस्ते केले.यावेळी तथागत गौतम बुध्द व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमांचे पुजन मान्यवरांनी केले.
यावेळी सामुहिक बुध्द वंदना घेण्यात आली.यावेळी प्रा.डाॅ.चाबुकस्वार यांचे धम्म चळवळ व आपली कर्तव्य यावर व्याख्यान संसन्न झाले.
पुरस्कार स्विकारल्यानंतर उत्तर देताना प्रा.राजा जगताप म्हणाले की,आजच्या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी तरूणाईने वाचन संस्कृती वाढवली पाहिजे व गुनवत्ता संपादित करून स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले पाहिजे समाजातील तरूणात शहानपण येण्यासाठी विहारातून संस्कार दिले पाहिजेत आपल्या गावातील बुध्द विहार विद्यार्थ्यांना वाचालयला लावते आहे व आपण विहारातून चांगले उपक्रम राबवत आहात आपल्या विहाराचा आदर्श परिसरातील धम्म बांधव नक्किच घेतील पुरस्कार दिल्याबद्दल त्यांनी शेवटी संयोजकांचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जीवन ढावारे,सौरभ होळकर,वैभव शिंदे,महादेव मांदळे,निखिल जाधव,दिनेश कांबळे या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.सदर पुरस्कार वितरण सोहळ्याला शषिकांत सोणवने,समाधान सरवदे तेर,
नवनाथ जोगदंड गोरेवाडी,अशोक शिखरे ,प्रदिप भालेराव कावळेवाडी,निखिल भालेराव गोवर्धनवाडी,आदी गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.
सूञसंचालन व आभार खंडू साळुंखे यांनी मानले.यावेळी ढोकी येथील बौध्द उपासक—उपासिका यांचेबरोबरच परिसरातील अनेक गावचे नागरिक उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *