प्रा. डॉ. संतोष देठे यांच्या पुस्तकाचे विमोचन.

 

लोकदर्शन👉 मोहन भारती

राजुरा :– लोकनेते स्व. प्रभाकरराव मामुलकर यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून श्री शिवाजी महाविद्यालय, राजुरा येथील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. संतोष देठे यांच्या निश्वयाच्या महामेरू : प्रभाकरराव मामुलकर’ या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा महाविद्यालयाच्या सभागृहात थाटात संपन्न झाला.
या प्रसंगी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष तथा माजी आमदार मा. अँड संजय थोटे अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे अध्यक्ष मा. सुधाकरराव कुंदोजवार, संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्रीधरराव गोडे, संस्थेचे हिशोब तपासणीस मा. दत्तात्रयजी येगीवार, संस्थेचे सचिव मा. अविनाशजी जाधव, संस्थेचे सहसचिव व माजी प्राचार्य मा. डी. बी. भोंगडे, संस्थेचे कोषाध्यक्ष मा. साजिद बियाबानी तसेच जि. प. माजी अध्यक्ष मा. संतोष कुमरे, प्रा. दितीप चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम.वारकड, उपप्राचार्य डॉ. आर. आर. खेरानी, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्री अविनाश दोरखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या निमित्ताने महाविद्यालयाचा ‘यशश्री’ वार्षिकांकाचे विमोचन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला आदर्श शिक्षण प्रसारक मंडळा अंतर्गत शाळा व महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. डॉ. राजेंद्र मुद्दमवार सर तर आभार प्रदर्शन डॉ. वनिता वंजारी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here