कळंबुसरे प्राचीन शिवमंदिर येथे चौथा श्रावणी सोमवार महोत्सव साजरा.

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे
उरण दि 23 ऑगस्ट रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील कळंबुसरे गावातील असलेले प्राचीन शिवमंदिरात चौथा श्रावणी सोमवार महोत्सव मोठ्या उत्साहाने ग्रामस्थांकडून साजरा करण्यात आला. सकाळी 06 वाजता महाअभिषेक करून दिवसाची सुरुवात झाली. गावातील दानशूर व्यक्तिमत्त्वांकडून उपवासाचे सकाळी फराळ तसेच संध्याकाळी महाप्रसादाचे आयोजन केले होते. या महाप्रसादाचे दुपारी सर्व ग्रामस्थांकडून नियोजन करण्यात आले. संध्याकाळी मंदिरात हरीपाठ तसेच सुश्राव्य कीर्तन होते. तसेच या चौथ्या आणि शेवटच्या श्रावणी सोमवारी मंदिरात सर्व ग्रामस्थांकडून दीप प्रज्वलन करण्यात आले. दीप प्रज्वलनचा सन्मान ग्रामस्थांनी पत्रकार मिलिंद खारपाटील, दर्शना माळी तसेच तृप्ती भोईर यांना दिला. व या मान्यवरांचा ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आले.नंतर शिवमंदिरात महाआरती करण्यात आली. या महाआरतीला ग्रामस्थांनची प्रचंड प्रमाणात गर्दी होती . विशेष सेवा ज्ञानेश्वर पाटील तसेच संजय म्हात्रे त्याचबरोबर सर्व ग्रामस्थांकडून देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here