शर्मिला राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते उरण पनवेल मधील शेकडो महिलांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश.

लोकदर्शन👉 विठ्ठल ममताबादे

 

उरण दि 22ऑगस्ट मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या पत्नी सौ.शर्मिला राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते आणि मनसे सरचिटणीस रिताटाई गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत उरण पनवेल मधील शेकडो महिलांनी व जेष्ठ नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात जाहीर प्रवेश केला. राजसाहेबांच्या शिवतीर्थ ह्या निवासस्थानी हा प्रवेश सोहळा संपन्न झाला.नवीन रायगड जिल्हाध्यक्ष संदेशभाई ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण दळवी तसेच प्रणव कारखानीस यांच्या मार्गदर्शनाखाली खारघर येथील मंजुषा पवार यांच्या समवेत अनेक महिलांनी तसेच उरण महिला शहर अध्यक्षा सुप्रिया सरफरे व मनसे उरण शहर अध्यक्ष धनंजय भोरे यांच्या प्रयत्नांनी उरण येथील अर्चना साळुंखे,राखी पाटील,अश्विनी ठाकूर आणि इतर महिलांनी पक्ष प्रवेश केला.यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष संदेशभाई ठाकूर ,जिल्हा सचिव केसरीनाथ पाटील ,महिला जिल्हाध्यक्षा आदिती सोनार,पनवेल महानगरपालिका शहर अध्यक्ष तथा पक्ष प्रवक्ते योगेश चिले, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण दळवी,प्रणव कारखानीस, उरण शहर अध्यक्ष धनंजय भोरे,द्रोणागिरी शहर अध्यक्ष रितेश पाटील,पनवेल तालुका अध्यक्षा वर्षा पाचभाई,उरण शहर अध्यक्षा सुप्रिया सरफरे, रेखा पवार,विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष गणेश तांडेल,शहर अध्यक्ष प्रतीक अमृते आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here