आदित्य बिर्ला पब्लिक स्कुल, गडचांदूर येथे स्वतंत्र्य दिन साजरा

 

लोकदर्शन👉 मोहंन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
आदित्य बिर्ला पब्लिक स्कुल, गडचांदूर येथे अमृत महोत्सवी स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
ध्वजारोहण माणिकगड सिमेंट वर्क्स गडचांदूर चे युनिट हेड श्री अतुल कंसल यांच्या हस्ते करण्यात आले.
एन सी सी च्या विद्यार्थ्यांनी परेड संचलन करून मानवंदना दिली.
विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य वर आधारित देशभक्ती गीत,नृत्य, लेझीम नृत्य सादर केले.
कु.ईलाक्षी रामटेके व कु.गौरी गीऱ्हीपुंजे या विद्यार्थीनिनी स्वतंत्र दिन चे महत्त्व पटवून दिले.
प्रमुख अतिथी युनिट हेड अतुल कंसल व प्राचार्या अर्चना गोलछा यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन पवन बेले व देवेंद्र पटले यांनी केले.
याप्रसंगी कंपनी चे अधिकारी, शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here