वडगाव येथे माता मेळावा संपन्न

 

लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव येथे निपुण भारत अभियान अंतर्गत माता गटांचा पहिला माता मेळावा 20 ऑगस्ट ला आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला मार्गदर्शक म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री सखाराम परचाके उपस्थित होते तर अध्यक्ष म्हणून माता गटातून सौ प्रियंका शेडमाके उपस्थित होत्या सदर निपुण भारत अभियानाचा मुख्य उद्देश असलेल्या समाजाचा सहभाग हा घटक लक्षात घेऊन सर्व मातांच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांना मूलभूत वाचन क्षमता विकास व गणितीय क्रिया करता याव्यात यासाठी त्यांच्या मातांचा गट करून तसेच ज्या माता उच्चशिक्षित आहेत त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ दिला पाहिजे व ज्या मातांना विविध प्रकारच्या पाककृती येतात किंवा अन्य कलाकृती येत असतील अशा त्यांच्या कौशल्याचा विद्यार्थ्यांना फायदा व्हावा यासाठी शाळा स्तरावर अशा प्रकारच्या माता गटांची निर्मिती करण्याचे शासन निर्देश असल्याचे मुख्याध्यापक श्री परचाके यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले तसेच यावेळी उपस्थित सर्व मातांनी आपले शिक्षण व कलागुणांची माहिती दिली तसेच या उपक्रमात सहभागी होण्याची ही त्यांनी तयारी दर्शविली तसेच निघून भारत या घटकावर समाजाचा सहभाग हा कशाप्रकारे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी महत्त्वाचा आहे हे सहाय्यक शिक्षक श्री काकासाहेब नागरे व श्री नितीन जुलमे यांनी उपस्थित मातांना समजावून सांगितले यावेळी इतर त्यांच्या माता या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तसेच शाळेतील शिक्षक श्री शिवाजी माने श्री वसंत गोरे श्री सुरेश टेकाम व श्री अनिल राठोड आणि मॅजिक बसच्या वतीने कुमारी हर्षाली खारकर हे देखील उपस्थित होते . जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा वडगाव येथे हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here