माजी सरपंच चंपत येडमे यांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– कोरपना तालुक्यातील मौजा पिपर्डा येथील माजी सरपंच तथा गोंडवाना गणतंत्र पार्टीचे कार्यकर्ते चंपत भीमराव येडमे यांनी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर आणि काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण यावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आमदार सुभाष धोटे यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयात काँगेस पक्षाचा दुपट्टा प्रधान करून त्यांचे काँग्रेसमध्ये स्वागत केले.
या प्रसंगी कोरपना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, संजय जाधव, माजी सरपंच खादिर भाई, तालुकाध्यक्ष गणपत आडे, माजी उपनगराध्यक्ष अशपाक शेख, बाबाराव मालेकर यासह अनेकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here