शेतीशाळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

 

लोकदर्शन वालुर/प्रतिनिधी👉 महादेव गिरी

कण्हेरवाडी ता.सेलू येथे राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस उत्पादकता वाढ व मुल्य साखळी विकास योजने अंतर्गत शेती शाळेचे आयोजन करण्यात आले.
कण्हेरवाडी हे गाव राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस व मुल्यसाखळी प्रकल्पांमध्ये निवडले असून गावातील १०० हेक्टर क्षेत्रावर हा प्रकल्प राबवला जात आहे. शेतकऱ्यांनी कापूस पिकाचे एक वाण लागवड करावे व कृषी विभागाच्या मार्गदर्शक सुचनानुसार व्यवस्थापन केल्यास उत्पादनाचे विक्री पश्चात मार्गदर्शन मिळणार आहे. याचाच एक भाग म्हणून शेतीशाळा चे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये कृषी सहाय्यक संदीप शेळके यांनी उपस्थित शेतकऱ्यांना एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन या विषयावर सखोल मार्गदर्शन केले .कृषी सहाय्यक संदीप शेळके यांनी शेतीशाळा मध्ये शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतात घेऊन जाऊन मित्र कीड व शत्रू कीड यामधील फरक व मित्र किडींची ओळख करून दिली तसेच फरोमन ट्रॅप चे महत्व व ते कशा पदधतीने लावावे याचे देखील प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.फवारणी किट चा वापर कसा करावा यासाठी उपस्थित शेतकऱ्यानं पैकी एकास फवारणी किट परिधान करून दाखवण्यात आले .सदर शेतीशाळेला महिलांचा उ्स्फूर्त प्रतिसाद होता. शेतीशाळा मध्ये उपस्थित शेतकऱ्यांना फेरोमन ट्रॅप व शेतीशाळा किट चे वाटप ग्राम पंचायत सदस्य अमोल काकडे ,पोलीस पाटील मधुकर काकडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी नितीन चव्हाण ,कृषी मित्र विजय चव्हाण ,प्रगतीशील शेतकरी महेंद्र वाटूरे ,माणिक डोंबे,भगवान काकडे,प्रदीप चव्हाण व इतर शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रगतीशील शेतकरी महेंद्र वाटूरे यांनी केले तर आभार प्रदर्शन नितीन चव्हाण यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here