कोरपना येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव ला प्रारंभ

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना,,
,,,,,,,,,,,,,,,,,,
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ पावेतो साजरा केला जात आहे.त्या अंतर्गत नगर पंचायत कोरपना तर्फे १३ ऑगस्ट २०२२ रोजी नगर पंचायत व राजीव गांधी चौक इथे झेंडा वंदन करण्यात आले.
नगर पंचायत येथील झेंडावंदन उपनगराध्यक्ष श्री. इस्माईल शेख यांच्या हस्ते व राजीव गांधी चौक येथील झेंडावंदन करण्याचा मान कोरपना नगरातून बारावी वर्गात प्रथम क्रमांक पटकावलेल्या कु. श्रावणी अरविंद अवथरे यांनां देण्यात आला .
या प्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री. विजयराव बावणे नगरपंचायत चे
नगरसेवक मनोहर चन्ने , नितीन बावणे मोहम्मद शेख , निसार शेख लक्ष्मण पंधरे, सुभाष हरबडे, रेवती लोडे, देविका पंधरे, जोस्तना खोबरकर, राधिका मडावी, आरीफा बेगम,वर्षा लांडगे, आशा झाडे, सविता तुमराम, गिता डोहे व नगर पंचायत अधिकारी व कर्मचारी व नगरवासी कोरपना उपस्थित होते….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here